Parinay Fuke News : वाळुमुळे अडलेली घरकुले आता होतील पूर्ण, परिणय फुकेंचा पाठपुरावा !

Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाच ब्रास वाळू मोफत देण्याची मागणी केली होती.
Dr. Parinay Fuke
Dr. Parinay FukeSarkarnama

Bhandara District News : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्यासाठी काही रक्कमही लाभार्थ्यांना देण्यात आली. पण आकाशाला भिडलेल्या वाळुच्या किमती त्यामध्ये अडसर ठरल्या आणि घरकुले रखडले. आता घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. (Radhakrishna Vikhe Patil was asked to give five brass sand free of charge)

भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गरीबांना घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याची मागणी केली होती. विखे पाटलांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश निर्गमित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तहसीलदारांना आदेश दिले आहेत. तसे पत्रही संबंधित तहसीलदारांना प्राप्त झाले.

महागड्या वाळुमुळे घरकुलांचे बांधकाम अडले होते. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी डॉ. परिणय फुके यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे पाच ब्रास वाळू मोफत देण्याची विनंती केली होती.

फुके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत महसूलमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर निर्णय घेऊन लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल २६ मार्चला जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आदेश दिले.

Dr. Parinay Fuke
Parinay Fuke : गोसेखुर्द आणि कऱ्हांडला अभयारण्याच्या दुहेरी कोंडीतून अशी सुटली तीन गावे !

काय म्हटले आहे आदेशात ?

स्वामित्वधन न आकारता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता अलेल्या शासनाच्या (State Government) कोणत्याही गृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी पाच ब्रासपेक्षा अधिक नाही येवढी वाळू काढण्यास परवानगी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता दिशानिर्देशक सूचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांकरिता व दुर्बल घटकाकरिता राखीव घाट करण्याची तरतुद आहे. जिल्ह्यातील (Bhanara) ६० वाळू घाटांना पर्यावरण मंजुरी प्राप्त झाली आहे. पर्यावरण अनुज्ञप्ती प्राप्त झालेल्या घाटांमधून काही घाट दुर्बल घटकांकरिता राखव ठेवण्याची तरतूद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com