भ्रष्टाचार करण्यात परमबीरसिंह आणि अमितेषकुमार हे दोघे जुळे भाऊ...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, Chief Minister Uddhav Thackeray महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी Jwala Dhote सांगितले.
भ्रष्टाचार करण्यात परमबीरसिंह आणि अमितेषकुमार हे दोघे जुळे भाऊ...
Jwala Dhote, Parambir Singh and Amitesh Kumar Sarkarnama

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने आणि राजकीय व्देशातूनच कारवाई करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भ्रष्टाचार करण्यात पोलिस महासंचालक परमबीरसिंह आणि नागपूरचे पोलिस आयुक्त अतिमेश कुमार हे दोघेही जुळे भाऊ आहेत, असल्याचाही घणाघात त्यांनी केला.

ते दोघेही राज्य सरकारमध्ये कार्यरत राहून केंद्राच्या इशाऱ्यांवर काम करतात. त्या दोघांचेही दूरध्वनी आणि भ्रमणध्वनींचा सीडीआर तपासल्यास सत्य बाहेर येईल, असे सांगत ज्वाला धोटे म्हणाल्या, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दर पंधरा दिवसात उच्च न्यायालयाची नोटीस येते. हे नागपूरचे भूषण नाही तर या प्रकारामुळे खाकी बदनाम होत आहे. पोलिस आयुक्तांनी वारांगणांवरसुद्धा अन्याय केला असून त्यांचे सामाजिक अधिकार हिरावले. तृतियपंथीयांनाही ते सापत्न वागणूक देतात. त्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करतात. अलीकडे एका आदिवासी महिलेवर अत्याचार झाला. मात्र, त्याची तक्रारसुध्दा घेतली नाही. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत नाही. शहरात काय सुरू आहे, याची इत्थंभूत माहिती पोलिसांच्या विशेष शाखेने ठेवायला पाहिजे आणि ती माहिती गृहमंत्री, मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्या विभागाची आहे. परंतु, प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली जात नाही. केवळ खोटी माहिती पुरविली जाते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आदिवासी महिलेच्या प्रकरणात त्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी नागपूरला नवीन पोलिस आयुक्त देण्याची मागणी त्यांनी केली. हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.

Jwala Dhote, Parambir Singh and Amitesh Kumar
परमबीरसिंह तब्बल सहा महिन्यांनी आले मुंबईत अन् म्हणाले...

मुन्ना यादवला फडणवीसांचा आशीर्वाद..

ठाणे येथे बनावट स्टॅम्प घोटाळा झाला होता. त्या स्कॅममध्ये परमवीर सिंह यांचा हात होता. त्याच धर्तीवर नागपुरात आजही बनावट स्टॅम्प बनविणारे रॅकेट सुरू असून याची पुरेपूर माहिती पोलिस आयुक्तांना आहे. महिनाभरापूर्वीच एका महिलेला जुने स्टॅंपविक्री करताना सदर पोलिसांनी अटक केली होती. या घोटाळ्याचे तार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळलेले आहेत. मुन्ना यादवने अनेकांच्या जमिनी हडपल्या असून त्यालाही फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपी ॲड. सतीश उके यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in