पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली मनातील खदखद्

लोकांची सेवा (Service) करण्याची एकही संधी कधीही सोडणार नाही
पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली मनातील खदखद्
Pankaja Munde/ Facebook Sarkarnama

बुलडाणा : ''माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला मी दहा परिक्रमा करेन, एखाद्या गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवून मी नतमस्तक होईन, पण कुठल्याही पदासाठी कोणापुढे हात पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत,''असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या मनातली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. '' पद असो वा नसो, माझ्यावर गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. एखादी संधी नाही मिळाली तरी चालेल, पण लोकांची सेवा करण्याची एकही संधी कधीही सोडणार नाही, अशी शपथ गोपीनाथ मुंडेंना (Gopinath Munde) आम्ही दिली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Pankaja Munde/ Facebook
'तर.. कृषी कायदे पुन्हा लागू होतील'

दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे राज्यभरात अस्थिरता पसरली होती. अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले. दिल्लीत वरिष्ठांशी झालेल्या भेटीनंतर पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.

राज्यात मुंडेंचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रीतम मुंडेंना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले होते. राज्यात मुंडेंचा प्रभाव कधीच कमी होणार नाही तो वाढतच जाईल. प्रीतम मुंडे यांनी कधीही मंत्रिपदाची अपेक्षा केली नसल्याने त्या नाराज असल्याचा प्रश्नच येत नाही. भाजपसाठी मुंडे परिवाराने मोठं योगदान दिल आहे. त्यामुळे आम्ही कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. वडिलांच्या निधनानंतर प्रीतम राजकारणात आली. आम्ही नेतृत्व करणारे नाही तर कार्यकर्ते आहोत, असे म्हणत त्यांनी त्यावेळी नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देत राज्यातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणीही केली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in