Pandharpur : पंढरपूर प्रकरणी आधीच विश्‍वासात घेतले असते, तर ही वेळ आली नसती !

Mahadev Jankar : होळकर वाड्याचा एक बुरूज पाडलेला आहे.
Pandharpur
PandharpurSarkarnama

Shinde and Holkar Wadi should not touch : पंढरपूर कॉरीडोअरचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे पाडण्यात येणार आहे, असे म्हणत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर यावर वादळी चर्चा झाली.

ऐतिहासिक शिंदे आणि होळकर वाड्यांना हात लागू नये, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली. होळकर वाड्याचा एक बुरूज पाडलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याबद्दल जनतेच्या भावना जुळलेल्या आहेत, असेही ते म्हणाले. वारकरी, व्यापारी आणि संबंधित लोकांना विश्‍वासात न घेतल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या लोकांना आधीच विश्‍वासात घेतले असते, तर ही वेळ आलीच नसती, असे सचिन अहीर म्हणाले.

पंढरपूर कॉरीडोअरसोबतच पालखी मार्गसुद्धा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तशी घोषणा केली आहे. याचा आराखड्यात समावेश आहे का, असाही प्रश्‍न अहीर यांनी केला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात हा विषय मी घेतला होता. तेव्हा वारकरी, महाराज मंडळी यांच्यासोबत पुणे येथे बैठक घ्यावी, निर्देश देण्यात आले होते. पण ती बैठक घेतली गेली नाही.

Pandharpur
Pandharpur Politics : विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांची परिचारकांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी!

पुण्यात मोपलवार यांनी तीन बैठका घेतल्या, पण पंढरपूरकरांना त्याची सूचना देण्यात आली नाही. वारकऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. वाराणसी, उज्जैनसोबत पंढरपूरची तुलना होऊ शकत नाही. गोदावरी, गंगा आणि चंद्रभगा, अशीही तुलना होऊ शकत नाही. येथील दगड आणि गवतालासुद्धा धक्का लावणार नाही, यासाठी आश्‍वस्त करा.

चंद्रभागेतील प्रदूषण वाढत चालले आहे. सावता महाराज मंदिर आणि राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या राम मंदिराला तडा जाणार आहे. तेव्हा पंढरपूर (Pandharpur) कॉरीडोर करताना वारकऱ्यांना, कीर्तनकारांना आणि लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्या आणि ऐतिहासिक वारसा मोडणार नाही, याची गॅरंटी द्या, असे आमदार मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

Pandharpur
Pandharpur News : प्रणिती शिंंदेंनी मतदारसंघापुरते सीमित राहू नये; जिल्हाभर काम करावे : काँग्रेस नेत्याचा सल्ला

ऐतिहासिक वारसा जपला जाईल. ज्या सोयी सुविधा वारकऱ्यांना मिळाल्या पाहिजे, त्या दिल्या जातील. विषय संवेदनशील असल्यामुळे आराखड्याला अजून सुरूवातच झाली नाही. आराखड्यातील एक वीट देखील अद्याप लागलेली नाही. बुरूज ढासळल्याचे जे सांगितले जात आहे, ते या आराखड्यामुळे नाही तर नैसर्गिक आपत्तीमध्ये तो ढासळा असावा.

आतापर्यंत १० जुलै २०२२, १२ सप्टेंबर २०२२ आमदार खासदार, विश्‍वस्त, वारकरी, सरपंच, नगरपंचायत. दिंडीकरी, व्यपारी, पत्रकार यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बैठक घेतली. त्यानंतर तीन बैठका पालकमंत्र्यांनी घेतल्या, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com