Pafull Patel News : शिंदे-फडणवीसांनी आमच्याच योजनांची नावे बदलवून त्या मांडल्या !

Gondia : शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना आणल्या, असा केवळ भास निर्माण केला गेला आहे.
Prafull Patel
Prafull PatelSarkarnama

The government has not introduced any new schemes : शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने कोणत्याही नवीन योजना आणलेल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या ज्या योजना होत्या, त्यांची नावे बदलून फक्त त्याच योजना जनतेसमोर मांडला, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना आणल्या, असा केवळ भास निर्माण केला गेला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्यात आला. मात्र आता या सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हा बोनस आम्ही दिला होता, तेवढा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर त्यांच्या घोषणांचा कुठलाही फरक पडणार नाही.

खत खरेदी करताना जात विचारणे चुकीचेच..

खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागत आहे. याबाबत विचारले असता, ही फार चुकीची बाब आहे. ही योजना आपल्या देशाची आहे आणि ती सर्वांसाठी तयार होते. अशा पद्धतीने कोणी चुकीचे काम केले असेल, तर ते निषेधार्थ आहे. सरकारने या प्रकाराची चौकशी करावी. यामुळे लोकांमध्ये जो भेदभाव होतो आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Prafull Patel
Prafull Patel : अनिल देशमुखांप्रमाणे या प्रकरणातही ईडीला पुरावा मिळणार नाही !

भाजप नव्हे तर एनडीपीपीला समर्थन..

विकास निधीसाठी आम्ही एनडीपीपी या सत्ता पक्षाला नागालॅंडमध्ये समर्थन दिले आहे. आम्ही भाजपला (BJP) पाठिंबा दिला नाही. चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा खुलासा प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी केला आहे. नेफ्यू रियो यांच्या एनडीपीपी या पक्षाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. नागालॅंडमध्ये आमच्या स्थानिक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (NCP) आमदारांनी विकास निधीसाठी सत्ता पक्षाला समर्थन द्यावे, अशी मागणी केली होती. म्हणून आमच्या आमदारांना विकास निधी मिळावा, म्हणून एनडीपीपीला समर्थन दिल्याचे पटेल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com