आमचे आमदार प्रशिक्षणासाठी गेले, कुणाची तक्रार करायला नाही…

तलवार दाखवताना उद्देश काय होता, हे तपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे चुकीची कारवाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई केली पाहिजे, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नागपूर : आमच्या आमदारांची आमच्या मंत्र्यांवर कुठलीही नाराजी नाही. पुढील काळात महाराष्ट्रात (Maharashtra) कॉंग्रेसला (Congress) अधिक बळकट करण्यासाठी आमचे मंत्री, आमदार जाणार आहेत. त्यामुळे तक्रार करायला आमदार दिल्लीत हायकमांडकडे जात आहेत, या चर्चेला कुठलाही अर्थ नाही. आमदार प्रशिक्षणासाठी दिल्ली गेले आहेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

ॲड. सतीश उकेंवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना नाना म्हणाले, प्रत्येक कारवाईच्या मागे त्या त्या तपास यंत्रणांचे अधिकार असतात. ईडीची कारवाई आतंकवादी किंवा ड्रग्जच्या व्यवहारातून पैशांचे व्यवहार होत असतील, तर त्यामध्ये केली जाते. पण काल नागपुरात झालेली ईडीची कारवाई भाजपच्या नेत्यांनी मागील काळात जी कबुतरबाजी केली, त्यानंतर झाली आहे. ईडीला चिल्लर बनवण्याची काम भाजपने केले आहे.

‘त्या’ पोलिसांवर कारवाई केली पाहिजे..

जी ईडीची स्वायत्तता आहे, त्यासंबंधाने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुमोटो घेतला पाहिजे. ईडीच्या माध्यमातून केंद्राच्या मदतीने दहशत पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे, हे थांबविले पाहिजे. त्यासाठी मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आम्ही विनंती केली आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर तलवार दाखवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत बोलताना नाना म्हणाले, कायदा हा सर्वांसाठी समान आहे. तलवार दाखवताना उद्देश काय होता, हे तपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे चुकीची कारवाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई केली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

गृहमंत्र्यांना त्याची माहिती नव्हती..

मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांना विचारून ती कारवाई केलेली नाही. गृहमंत्र्यांनe त्याची माहिती नव्हती, हे प्रकरण तपासून काय ते सांगतो, असे ते म्हणाले आहेत. चुकीची कारवाई करणे, हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई व्हावी, ही मागणी आहे. दिल्लीत आमच्या आमदारांचे एक प्रशिक्षण आहे. त्यासाठी आमच्या पक्षाचे आमदार दिल्लीला जात आहेत आणि आमच्या आमदारांनी हायकमांडला भेटीची वेळ मागितली, त्यात गैर काय आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपमध्ये मोठा उद्रेक आहे, त्याची चर्चा केली जात नाही, असेही ते म्हणाले.

Nana Patole
आमच्या पक्षात अनेक विद्वान, आम्हाला गरज नाही : नाना पटोले

फडणवीस आणि मी कायम मित्र...

राजकीय आणि पक्षीय विरोध असू शकतो, पण मनाचा विरोध आमचा नाही. त्यामुळे जे घटतंय त्याला वेगळ्या वळणाने नेण्याची गरज नाही. फडणवीस आणि मी कायम मित्र आहोत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ईडीच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना माहिती न देता मुंबईच्या ईडीने ॲड. सतीश उकेंना अटक करणे म्हणजे यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप पटोलेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com