OBC ...अन्यथा ओबीसी बहुजन महासंघ वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना जागृत करणार !

Bhandara : हा अन्याय दूर न झाल्यास संघर्ष करणार, असे खुशाल बोपचे यांनी म्हटले आहे.
OBC Leader
OBC LeaderSarkarnama

OBC News : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत नुकतेच पार पडले. नागपूर (Nagpur) करारानुसार या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) कालावधी एक महिन्याचा असायला हवा, मात्र गेल्या काही वर्षांपासून नागपूर करार केवळ कागदांवर मर्यादित राहिला आहे. या अधिवेशनातही विदर्भावर अन्यायच झाला आहे. हा अन्याय दूर न झाल्यास जनशक्तीला एकजूट करून संघर्ष करणार, असे माजी खासदार आणि अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे खुशाल बोपचे यांनी म्हटले आहे.

सन १९६०मध्ये भाषिक प्रांतिक रचनेच्या आधारावर महाराष्ट्र (Maharashtra) हे मराठी भाषिकांचे राज्य असावे, या मुद्द्यावर विदर्भ (Vidarbha) हे राज्य असावे आणि विदर्भाच्या विकासासाठी नागपुरात एक महिन्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे, असा करार त्यावेळी झाला होता. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांत त्या नागपूर कराराचा कालावधी एक-दोन आठवड्यांच्या पुढे जात नाही. यंदाही दोन आठवडेच अधिवेशन झाले. त्यात महाराष्ट्रातील ‘ईडी’ सरकारने हेक्टरी १५,००० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे सरकारचे बियाणांचे गणित समजले नाही. २०२० मध्ये तत्कालीन सरकारने ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला होता. आता घोषणा केली, तर ही योजना फक्त दोन हेक्टरसाठी लागू झाली. म्हणजे वरील जमिनीवर केलेली शेती. या योजनेपासून दोन हेक्‍टर क्षेत्र वंचित राहणार आहे.

परंतु सध्याच्या सरकारच्या म्हणण्यानुसार १६ क्विंटल खरेदीचा हिशोब केला तर २ हेक्‍टरचे उत्पादन ८० क्विंटल होईल आणि सरकारच्या घोषणेनुसार ३०,०००, ८० क्विंटल धानावर केवळ ३०,००० रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. प्रति क्विंटल ३७५ रुपये बोनस मिळणार आहे आणि २ हेक्टरवरील शेती सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहे. ‘भीक नको पण कुत्रा आवर’, असे म्हणण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे. ३८० रुपयांचा गॅस सिलिंडर ११०० रुपयांना विकता येतो, ४७ रुपयांचे डिझेल १०० रुपयांना विकता येते, ६० रुपयांचे पेट्रोल १०७ रुपयांना विकता येते, वीज बिल दुप्पट होते, खताची किंमत आकाशाला गवसणी घालू शकते.

OBC Leader
Bhandara : आता पेटतोय महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद, भंडारा जिल्ह्यातील लोक होताहेत आक्रमक...

उत्पादन खर्चाच्या आधारे खर्चाच्या दुप्पट नफा देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर करावे आणि सुपर फाईन करावे, अन्यथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम करणार आहे. त्यांच्या हक्कांसाठी जनशक्तीला एकजूट करणार असल्याचे माजी खासदार आणि अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे खुशाल बोपचे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com