Vidarbha : जुन्या पेन्शनचा विरोध भोवला, भाजपच्या आमदारांवर ‘पेन्शन' घेण्याची वेळ

BJP : भाजपची पीछेहाट हा भाजपसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.
Nago Ganar, Sudhakar Adbale, Dhiraj Lingade and Ranjit Patil.
Nago Ganar, Sudhakar Adbale, Dhiraj Lingade and Ranjit Patil.Sarkarnama

Maharashtra Graduate And Teacher Constituency Election : नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मातब्बर नेते असतानाही विधान परिषदेच्या विदर्भातील लागोपाठ दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला चारीमुंड्या चीत व्हावे लागले. सध्या नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थीत विद्यमान आमदार नागो गाणार यांना काँग्रेस समर्थीत अडबाले यांनी पहिल्या पसंतीच्या तब्बल आठ हजारावर मतांनी पराभूत केले.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यारूपाने भाजपचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे असताना भाजपची पीछेहाट हा भाजपसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतमोजणीत भाजपचे विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यापेक्षा माघारी चालत आहेत. गाणार हे गडकरींच्या (Nitin Gadkari) जवळचे मानले जातात तर डॉ. रणजित पाटील हे फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जवळचे मानले जातात. हा दोन्ही नेत्यांसाठी धक्का आहे.

या विधान परिषद निवडणुकीत विदर्भात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा हा सर्वांत प्रभावी ठरल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे भाजप समर्थीत उमेदवार नागो गाणार यांनी उमेदवारी अर्ज भरताना स्वतः जुनी पेन्शन योजना असे लिहिलेली टोपी घातली परंतु त्या टोपीचा उपयोग झाला नाही. जुनी पेन्शन लागू करण्यास विरोध करणारा आम्ही मतदार करणार नाही, अशा शपथा गावागावात घेण्यात आल्या.

सुरुवातीला हेटाळणीचा विषय ठरलेल्या या शपथांचा परिणाम दिसून आला. त्यामुळे एरवी निवडणुकीत दिसलेले जातीचे गणित तर साफ नापास झाले. एकेकाळी उमेदवाराबाबत काँग्रेस पक्षातच असलेली दुही यावेळी भाजपमध्ये दिसली. एकूण काय तर प्रस्थापित तर्कांना तडा देत यंदाच्या निवडणुकीचे चित्र दिसते आहे. अमरावती विभागात भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनाही जुनी पेन्शनचा फटका बसलाच परंतु कामगिरीच्या मुद्द्यावरही भाजपच्या या दोन्ही उमेदवारांबाबत पक्षातूनही नाराजीचा सूर होता. या सर्वस्थितीचा जबर फटका भाजपला बसला आहे. विशेष म्हणजे कधी नव्हे महाआघाडीतील पक्ष व नेत्यांनी एकत्रित काम केले. त्याचाही लाभ झाला.

Nago Ganar, Sudhakar Adbale, Dhiraj Lingade and Ranjit Patil.
BJP offers Satyajit Tambe : सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान ...

गेल्यावेळीही फटका..

गेल्यावेळी पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात देत आजवर कधीही काँग्रेसकडे येऊ न शकलेला पहिल्यांदाच हा मतदारसंघ भाजपकडून हिरावला होता. दुसरीकडे अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघात तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनाही स्पर्धेत नसलेल्या अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी दणका दिला होता.

काँग्रेसमध्ये चैतन्य..

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह होता. परंतु पक्ष नेत्यांतील मतभेद दिसत होते. या निवडणुकीमुळे भविष्यात विधान सभा निवडणुकीच्या गणितांवरही परिणाम होईल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना वाटते आहे. काँग्रेसचे विदर्भातील एकमेव खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री सुनील केदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांची मेहनत फळाला आल्याचे दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com