विरोधकांनी १५ वर्षांचे काम लोकांपुढे ठेवावे, खासदार मेंढेचे आव्हान...

या कार्यक्रमात राजकारण आणून काहींनी आपली विकास विरोधी भूमिका दाखवून दिली, असा प्रहार खासदार सुनील मेंढे MP Sunil Mendhe यांनी विरोधकांवर केला.
MP Sunil Mendhe
MP Sunil MendheSarkarnama

भंडारा : खर तर खांब तलाव परिसराच्या सौंदर्यीकरणाचा विषय पूर्णपणे भाजप सरकारच्या काळातला आहे. विषय कोणाच्या काळात काम झाले हे महत्वाचे नाही, पण यामुळे भंडाऱ्याच्या लोकांचाच फायदा आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमात राजकारण आणून काहींनी आपली विकास विरोधी भूमिका दाखवून दिली, असा प्रहार खासदार सुनील मेंढे यांनी विरोधकांवर केला.

खांब तलाव परिसराचे पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करण्यात आले. २०१९ मध्ये काम पूर्ण झालेल्या या तलावाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामदास शहारे होते. सोबत द्वारका प्रसाद सारडा, ईश्वरलाल काबरा, उल्हास फडके, चैतन्य उमाळकर, संजय एकापूरे, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, अरविंद भालाधरे, विनोद बांते, युवकांता रहांगडाले उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन झाले असताना एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्यांच्या नेत्याचे नाव पत्रिकेत नाही म्हणून कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा कार्यक्रम रद्द करण्याचे पत्र काढले. कार्यक्रमाच्या एक तास आधी पत्र काढणे हास्यास्पद आहे. हा विकास कामात खोडा घालण्याचा प्रकार आहे. खरं तर ज्या तलावाचे सौंदर्यीकरण होऊन लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी लागलेला सगळा निधी हा भाजपच्या काळात आला. २०१४ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्षांनी भूमिपूजन केले मात्र तेव्हा निधी आणि मंजुरीही नव्हती.

२०१६ मध्ये आम्ही भूमिपूजन केले. २०१९ मध्ये काम पूर्ण होऊन पर्यटन विकास महामंडळाने नगर परिषदेला हस्तांतरित केले आणि आज त्याचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे खासदार सुनील मेंढे म्हणाले. ज्या लोकांनी विकास कामात राजकारण आणले, त्यांनी त्याच्या नगर परिषदेच्या मागील १५ वर्षाचा पाढा वाचावा. आम्ही आमच्या पावणे पाच वर्षाच्या कामाने त्याला उत्तर देऊ असे सांगत, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले. विकासात राजकारण आणणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना रामदास शहारे यांनी सांगितले की, नगर पालिकेत भाजपची सत्ता आल्याने अनेकांची पालिकेतील मालगुजारी संपली. विकासाची गती वाढली. लोकार्पण कार्यक्रमाला विरोध करून विकासाला खीळ घालण्याचा काम विरोधक करीत आहेत.

MP Sunil Mendhe
भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!

याप्रसंगी मयूर बिसेन, आबिद सिद्धिकी, नितीन कडव नगरसेवक कंवलजीत सिंग चढ्ढा, आशु गोंडाने, दिनेश भुरे, रजनीश मिश्रा, जाबीर मालाधारी, विकास मदनकर, पप्पु भोपे, मनोज बोरकर, संतोष त्रिवेदी, सूर्यकांत इलमे, रोशन काटेखाये, भूपेश तलमले, सुदीप शहारे, राजेश टिचकुले, शिवा आजबले, ज्ञानेश्वर बोडखे, अंकुश कळंबे, अतुल वैरागडकर, अविनाश ब्राम्हणकर, मंगेश वंजारी, अजिज शेख, राजू पटेल, राजू भोजवानी, फइम शेख, शीतल तिवारी, अमोल शहारे, प्रशांत निंबोळकर, डॉ. आयलवार, कृष्णकुमार बत्रा, बंडू पारवे, नगरसेविका आशा उईके, वनिता कुथे, चंद्रकला भोपे, भूमेश्वरी बोरकर, मधुरा मदनकर, गिता सिडाम, शामिमा शेख, माला बगमारे, रोशनी पडोळे व आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com