Sunil Kedar on Nagpur ZP
Sunil Kedar on Nagpur ZPSarkarnama

झेडपीतील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमधील एका ‘एकनाथा’च्या शोधात !

परंतु कंभाले माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) विरोधी गटातील असल्याने त्यांना अध्यक्ष मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : शिवसेनेत इतिहासातील सर्वात मोठे बंड झाल्यानंतर नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेमध्येही कॉंग्रेसमध्ये (Congress) फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे ते विरोधी गटात तर जाऊन बसले नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेस सदस्य नाना कंभाले अध्यक्ष पदाचे दावेदार आहेत. परंतु ते माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) विरोधी गटातील असल्याने त्यांना अध्यक्ष मिळणे कठीण असल्याचे बोलले जात असताना त्यांनी आता उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेणे सुरू केले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी थेट अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ते विरोधी गटात गेल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या विरोधी भूमिकेमुळे जि.प.तील (ZP) सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेना सदस्यांसोबत त्यांनीही विरोधी भूमिका घेतल्याने विरोधकांच्या संख्येत भर पडल्याचे दिसते.

१७ सामूहिक निधी वाटपाच्या विषयावरून कंभाले यांनी थेट जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांना लक्ष्य केले. अध्यक्षांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर कंभाले यांनी अध्यक्षांना थेट राजीनामाच देण्याची मागणी केली. त्यामुळे कंभाले व सत्ताधाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नाना कंभाले यांनी अध्यक्ष होण्याची इच्छा जाहीरपणे उघड केली आहे. गेल्या वेळीही त्यांनी दावा केला होता. परंतु अनुसूचित जाती महिलांसाठी अध्यक्षाचे आरक्षण निघाल्याने दावा करता आला नाही. यंदा खुल्या वर्गासाठी आरक्षण निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी दावा केला आहे.

Sunil Kedar on Nagpur ZP
Video: आमच्या लोकांना सांभाळण्यात उणिवा राहिल्या; सुनील केदार

जिल्हा परिषदेत माजी मंत्री सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे. अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे केदार गटाचे आहे. कृषी सभापतीही केदार समर्थक आहेत. कंभाले केदार विरोधी गटातील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अध्यक्षपद मिळणार नसल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अर्थसंकल्पीय सभेत त्यांनी पक्षाला अडचणीत आणले. कंभालेकडून उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आयते कोलीत मिळाले होते. अध्यक्ष पदासाठी त्यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. कॉंग्रेसमधील काही सदस्यांची चाचपणी त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांना ते सोबत घेण्याची चर्चा आहे. विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांमधील एका एकनाथांच्या शोधात आहे. कंभालेंच्या रूपात त्यांच्याकडे पाहण्यात येत आहे. राजधानीतील नाट्यमय घडामोडी उपराजधानीत घडण्याचीही चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in