अध्यक्षांसोबत दौरा करून आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचे वर्तन बदलले !

जिल्हा परिषदेत (ZP) सत्ताधाऱ्यांमध्ये गटबाजी आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातही गटबाजी आहे. विरोधी पक्षनेत्याची माळ आतिष उमरे यांच्या गळ्यात आल्यावर गटबाजी उफाळून आली आहे.
अध्यक्षांसोबत दौरा करून आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचे वर्तन बदलले !
ZP NagpurSarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेत यापूर्वी अनिल निधान विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यानंतर आतिष उमरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून विरोधकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना बदलण्याची मागणी होत असल्याची माहिती आहे.

काही महिन्यांपूर्वी शिक्षण समितीचा दौरा दिल्ली येथे झाला. त्यात अध्यक्षा रश्मी बर्वेसह सर्व पदाधिकारी व विरोधी पक्षनेतेसुदधा गेले होते. त्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचे वर्तन बदलले असल्याचे विरोधी पक्षाचे सदस्य खासगीत बोलत आहेत. त्यामुळे त्या दौऱ्यात नेमके घडले काय, या प्रश्‍नाचे उत्तर विरोधी सदस्यांकडून शोधले जात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या कामकाजावर काही सदस्य नाराज असून वरिष्ठांनाही याचा माहिती देण्यात आली. येत्‍या काही महिन्यात पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार आहे. विरोधी पक्ष नेतेही बदलण्याचा मागणी होत असून त्यातून हा सर्व प्रकार सुरू असल्याचे दुसऱ्या सदस्यांकडून सांगण्यात येते. विरोधी पक्षातील धुसफुशीचा सत्ताधाऱ्यांना फायदा होत असल्याचे तटस्थ सदस्यांचे मत आहे.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये गटबाजी आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातही गटबाजी आहे. विरोधी पक्षनेत्याची माळ आतिष उमरे यांच्या गळ्यात पडल्यावर गटबाजी उफाळून आली आहे. सदस्यांच्या प्रश्नांना न्याय देत नसल्याची भावना त्यांची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत (ZP) गत काही महिन्यांपासून विरोधकच नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आक्रमक असलेले विरोधी पक्षनेते अचानक शांत झाल्याचे पक्षातील सदस्यांकडून सांगण्यात येते.

पूर्वी विरोधकांच्या कक्षात मोठी गर्दी राहायची. तत्कालीन विरोधी पक्षनेते अनिल निधान पक्षातील सदस्यांचे काम अडल्यास प्रत्यक्ष विभाग प्रमुखांच्या भेटी घेत. शिवाय त्यांच्या कक्षात चांगली वर्दळ असायची. परंतु, आता विरोधी पक्षनेते बैठकीच्या दिवसांतच दर्शन होते. तर गत महिन्यापूर्वी शिक्षण समितीचा दौरा दिल्ली येथे झाला. त्यात अध्यक्षा रश्मी बर्वेसह सर्व पदाधिकारी व विरोधी पक्षनेत्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्या व्यवहारात बदल झाल्याची चर्चा विरोधी सदस्य खासगीत करतात.

ZP Nagpur
Video : अमोल मिटकरींनी नागपूर कनेक्शनचे पुरावे द्यावे...

शिवाय इतर सदस्यांसोबत संपर्कही केला जात नसल्याचा आरोप पक्षातील इतर सदस्यांचा आहे. सध्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. मात्र याबाबतचा प्रश्न उपस्थित करणारेच बेपत्ता असल्याने सत्ताधाऱ्‍यांचे चांगलेच फावत आहे. सत्ताधाऱ्‍यांनी टाकलेल्या जाळ्यात विरोधक अलगद अडकत असून विरोधकांच्या आपसी मतभेदामुळे सत्ताधाऱ्‍यांना फायदा होत आहे.

सत्तापक्ष नेतेही गायब!

सत्तापक्ष नेते अवंतिका लेकुरवाळेही जिल्हा परिषदेत दिसत नाही. काम होत नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत त्यांना प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु त्यांच्या भूमिकेवर सत्ताधारी पक्षातील काहींनी नाराजी व्यक्त केली. सत्तापक्ष नेते पद मिळाल्यापासून त्या कमी येत असल्याचा अनुभव सत्ताधारी सदस्यांचा आहे. नाराज असल्यामुळेच त्या येत नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.