Compensation : पावसाच्या नुकसानभरपाईची केवळ घोषणाच, पैसे अद्याप मिळालेच नाहीत...

Administrative system : प्रशासकीय यंत्रणेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
Amravati Agriculture
Amravati AgricultureSarkarnama

Amravati District News : खरीप हंगामात संततधार पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात वाढ करून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करून तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र ही नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नाही. प्रशासकीय यंत्रणेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) रोषाला सामोरे जावे लागत आहे. तब्बल २७७ कोटी ५८ लाख रुपयांची मदत अप्राप्त असून आता शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

२०२२-२३ च्या खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पावसामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रातील जिरायती, बागायती व फळबागांचे नुकसान झाले आहे. अमरावती, तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चिखलदरा या तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका, ज्वारी, मिरची, भुईमूग या पिकांसह केळी, संत्राचे नुकसान झाले. राज्य सरकारने (State Government) जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १३,६०० रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. तर, केळी, कांदा व भाजीपाल्यासाठी २७ हजार रुपये हेक्टरी व संत्रा पिकाच्या नुकसानीपोटी ३६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती.

महसूल व कृषी यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून संयुक्त अहवाल २७ सप्टेंबर २०२२ला शासनाला पाठविला होता. यामध्ये जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २ लाख १६ हजार ३०४ असून १ लाख ७१ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रातील पिके व फळबागा सततच्या पावसाने उद्धस्त झाल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने २७७ कोटी ८५ लाख रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारने हा निधी मंजूर करीत तशी घोषणा केली असली तरी त्यास तीन महिने उलटून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात एक छदामही जमा झाला नसल्याने सरकारप्रती रोष निर्माण झाला आहे.

Amravati Agriculture
Amravati : अमरावती ‘पदवीधर’ निवडणूक: भाजपची तयारी जोरात, कॉंग्रेस स्वबळावर...

जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती

पीक : बाधित शेतकरी : बाधित क्षेत्र : नुकसान भरपाई

जिरायती : १,९२,६१६ : १,५१,३८५ : २०५.८८

बागायती : ९४६ : ७५१ : २०.२९

फळबागा : २२,७४२ : १९.३५४ : ६९.६७

एकूण : २,१६,३०४ : १,७१,४९१ : २७७.५८

(नुकसान भरपाई कोटी रुपये)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in