१४७ शेतकऱ्यांची एक कोटीने फसवणूक; वणी पोलिसांत व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी (Wani) येथील बाजार समितीत तब्बल १४७ शेतकऱ्यांची एक कोटी ९३ हजार ५०२ रूपयांची फसवणूक करुन व्यापारी पसार झाले.
Wani, Yavatmal.
Wani, Yavatmal.Sarkarnama

संजय राठोड

यवतमाळ : कृषिप्रधान भारत देशात शेतकऱ्यांची कशी अवहेलना होते, हे दाखवणाऱ्या घटना रोजच घडत असतात. त्यामुळे कृषिप्रधान हे बिरुद केवळ कागदावरच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिल्ह्याच्या वणी (Wani) येथे तब्बल १४७ शेतकऱ्यांकडून (Farmers) माल खरेदी करून १.२५ कोटी रुपये न देता व्यापारी पसार झाले. वणी पोलिस (Police) स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी येथील बाजार समितीत तब्बल १४७ शेतकऱ्यांची एक कोटी ९३ हजार ५०२ रूपयांची फसवणूक करून व्यापारी आणि त्याचा एक सहकारी पसार झाले. शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांसह अन्य एकाविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज अमरचंद सुराणा आणि रूपेश कोचरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मातीच्या तिजोरीत बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून नशिबाचे प्रमाणपत्र सहीसाठी पावसासमोर ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी वणी येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केली होता. ५ ते ११ जानेवारी या कालावधीत शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांनी खरेदी केला होता. त्यामध्ये १४७ शेतकऱ्यांचा एक कोटी ९३ हजार ५०२ रुपयांचा शेतमालाचा चुकारा देणे अपेक्षित होते, तसेच बाजार समितीची आणि शासनाची सुपरव्हिजन फी भरणे व अडतेची अडत भरणेसुद्धा अनिर्वाय होते. पण हे न करता व्यापारी पसार झाले.

Wani, Yavatmal.
धानोरकरांच्या वणी-वरोराच्या प्रश्‍नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दाखवले राज्याकडे बोट...

व्यापारी धीरज सुराणा यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली. त्यामुळे शेतमाल विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दोन महिन्यांपासून या प्रकरणात बाजार समितीकडून चौकशी सुरू होती. पोलिसांत याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यावर प्रकरणाला वाचा फुटली. बाजार समितीची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याने वणी पोलिसही वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत होते. मात्र रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमाल खरेदी करून एक कोटीने शेतकरी व शासनाची फसवणूक करून व्यापारी व त्याचे साथीदार पंधरा दिवसापूर्वीच पसार झाले. त्यावेळी या प्रकरणात गुन्हे दाखल झाले नव्हते. बाजार समितीकडून मात्र कारवाईची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आता फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर दोघांचाही अटकेसाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com