Amravati Graduate Election : वय कमी असल्याने एक उमेदवार बाद, ३३ अर्ज वैध !

Divisional Commissioner Office : आज विभागीय आयुक्त कार्यालयात छाननी प्रक्रिया झाली.
Amravati Division Graduate Constituency Election
Amravati Division Graduate Constituency ElectionSarkarnama

Amravati Division Graduate Constituency Election : अमरावती (Amravti) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वय कमी असल्याने गजानन नेहारे या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला. तर नामांकन दाखल करणाऱ्या ३४ पैकी ३३ जणांचे वैध ठरविण्यात येऊन ते स्वीकृत करण्यात आलेत.

काल गुरूवारी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण ३४ जणांनी नामांकन दाखल केले आहेत. आज विभागीय आयुक्त कार्यालयात (Commissioner Office) छाननी प्रक्रिया झाली. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यावेळी उपस्थित होते. छाननी प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली.

निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांकडून ४४ अर्ज प्राप्त होते. गजानन नेहारे यांचे वय ३० पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आले. सोमवार १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट होणार असून खरी रणधुमाळी उडणार आहे. दरम्यान या मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढतीचे चित्र आहे. ३० जानेवारीला मतदान होणार आहे.

Amravati Division Graduate Constituency Election
Amravati : अमरावती ‘पदवीधर’ निवडणूक: भाजपची तयारी जोरात, कॉंग्रेस स्वबळावर...

अर्ज स्वीकृत झालेल्या उमेदवारांमध्ये गोपाळ वानखेडे, पांडुरंग ठाकरे, अरुण सरनाईक, किरण चौधरी, संदेश रणवीर, प्रा. डॉ. प्रफुल्ल राऊत, शरद झांबरे, श्याम प्रजापती, अ‍ॅड. धनंजय तोटे, माधुरी डहारे, धनराज शेंडे, मीनल ठाकरे, मधुकर काठोळे, आनंद राठोड, राजेश गावंडे, डॉ. रणजित पाटील (भाजप), डॉ. प्रवीण चौधरी, अनिल ठवरे, अनंतराव चौधरी, संदीप मेश्राम, उपेंद्र पाटील, लक्ष्मीकांत तडसे, नामदेव मेटांगे, डॉ. गौरव गवई, अनिल अमलकार, धीरज लिंगाडे (महाविकास), भारती दाभाडे, प्रवीण बोंद्रे, नीलेश पवार, सुहास ठाकरे, विकेश गवाले, अ‍ॅड, सिद्धार्थ गायकवाड, राजेश दांदडे यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in