आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली...

आता राज्य सरकार State Government शेतकऱ्यांच्या बाबतीत निष्ठुर झाले आहे काय, असा प्रश्‍न स्वाभिमानी Swabhimani शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली...
Ravikant Tupkar at HospitalSarkarnama

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरला नागपूर येथे संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान रात्री 11.30 वाजता पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले. परंतु, तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता ते सुरूच ठेवले. काल गुरुवारी (ता. १८) पहाटे 6 वाजता बुलडाण्यात पोचल्यावर त्यांना निवासस्थानासमोर ते सत्याग्रहास बसले.

दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली यामध्ये त्यांची शुगर वजन कमी झाली असून रक्तदाब वाढला आहे. बोलण्यासाठी सुद्धा त्रास होऊ लागला आहे. डॉ. प्रवीण पिंपरकर यांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. मात्र दुसरीकडे शासकीय यंत्रणा त्यांच्या आंदोलना दरम्यान प्रकृतीची कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेविरोधात रोष व्यक्त होत आहे. याशिवाय या आंदोलनाचा पुढील टप्पा चक्काजाम किंवा इतर मोठे आंदोलन होऊ शकते.

Ravikant Tupkar at Hospital
'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य

बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये चक्का जाम आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या बाबतीत कठोर झालेले केंद्रातील मोदी सरकार अखेर आज शेतकऱ्यासमोर झुकले आहे. पण विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीनसाठी अन्नत्याग आंदोलन करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती आज तिसऱ्या दिवशी खालावली आहे. पण राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. मग आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत निष्ठुर झाले आहे काय, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.