महानगरपालिका निवडणूक लांबणीवर, इच्छुकांच्या तयारीवर पाणी फेरले...

अकोला महानगरपालिकेची (Municipal Corporation) मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर मनपावर प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली.
Akola Municipal Corporation
Akola Municipal CorporationSarkarnama

अकोला : महागनरपालिकेची मुदत संपून पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील (OBC Reservation) सुनावणी लांबली. सोबतच न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येणार नाही, असे बजावल्याने महानगरपालिकेची निवडणूकही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे इच्छुकांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरल्या गेले.

अकोला (Akola) महानगरपालिकेची (Municipal Corporation) मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर मनपावर प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसारच नव्याने प्रभाग रचना व मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाने सुरू करण्यास सांगितले होते.त्यानुसार अकोला मनपासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे ३० प्रभागांतील ९१ सदस्यांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती.

ओबीसीशिवाय ही आरक्षण सोडत काढण्यात आली होती. याशिवाय प्रभाग निहाय मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यावरील हरकीत व सूचनांवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यानच काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय न लागल्याने पुढील आदेशापर्यंत नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर न करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. परिणामी राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांप्राणेच अकोला महानगरपालिकेची निवडणूकही लांबणीवर पडली आहे.

प्रभाग रचनेबाबतही होऊ शकतो फेरविचार..

राज्यातील सत्ता बदलानंतर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतही फेरविचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मनपात चार सदस्यीय प्रभाग रचना होती. तीच प्रभाग रचना पुन्हा लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Akola Municipal Corporation
अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सावरकर, बच्चू कडू यांना संधी मिळणार?

इच्छुकांचा तयारीला ‘ब्रेक’..

मनपा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेवून इच्छुकांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इच्छुकांच्या तयारीला ब्रेक लागला आहे. भाजपने इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली होती. इतर पक्षांनीही निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी त्यांच्या स्तरावर सुरू होती. मात्र, आता निवडणुका कधी होणार याबाबतच अनिश्चितता असल्याने सर्व तयारीला ‘ब्रेक’ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in