पक्षाच्या धोरणावर नाना म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी बदलवणे अवघड !

लोकांना आजकाल दिवसाही स्वप्न पडतात. पण प्रत्येकाला आपआपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे म्हणत महाविकास आघाडीमधील धुसफुशीवर बोलणे नाना पटोलेंनी (Nana Patole) टाळले.
पक्षाच्या धोरणावर नाना म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी बदलवणे अवघड !
Nana PatoleSarkarnama

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत शहर किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष, इतर पदाधिकाऱ्यांना बदलवणे अवघड होऊन बसते. ही भूमिका आम्ही पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे मांडू. पण उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात पक्षाचे जे धोरण ठरले, त्या आदेशाचे पालन करणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचे महत्व लक्षात घेता ही परिस्थिती श्रेष्ठींसमोर मांडू आणि मिळालेल्या सूचनांचे पालन करू, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज येथे म्हणाले.

लोकशाहीमध्ये आपआपल्या पद्धतीने बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकांना आजकाल दिवसाही स्वप्न पडतात. पण प्रत्येकाला आपआपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे म्हणत महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) धुसफुशीवर बोलणे नाना पटोलेंनी (Nana Patole) टाळले. हीतेंद्र ठाकूर यांच्या आमदारांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिला, याबाबत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघीडीचे सरकार स्थापन करताना जेवढे अपक्ष आमच्यासोबत होते, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे बाळासाहेब थोरात चर्चा करीत आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळेपर्यंत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात महाविकास आघाडीला यश येईल.

निवडणूक आयोगाला राजीव गांधी यांनी स्वायत्ता दिली आहे. निवडणुकीचा कालावधी किती असला पाहिजे, याची एक मर्यादा ठरलेली आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा निवडणुका मागे-पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. समजा विजय वडेट्टीवार हे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत आणि कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली, तर अशा वेळी आयोग निवडणूक माग-पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतो. ज्या भागात जास्त पाऊस पडत नाही, अशा ठिकाणी निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयानेही दिले आहेत. राज्यात जातिनिहाय जनगणना व्हावी, असे आमचे मित्रपक्ष कालच बोलले. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर जातिनिहाय जनगणना, हाच एकमेव पर्याय असल्याचे पटोले म्हणाले.

Nana Patole
मोठी बातमी ः नाना पटोलेंना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी उपाध्यक्षाचा गंभीर इशारा...

जातीय असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. अमुक कुणी आमच्या कॅटेगरीत आले, तर आमचे नुकसान होईल, ही भिती आज बहुजन समाजामध्ये आहे. ही भिती दूर करण्यासाठी जातिनिहाय जनगणना हाच महत्वाचा मंत्र आहे. निधीची समस्या येत असेल तर विकासाची चार कामे मागे पडली तरी चालेल, पण जातिनिहाय जनगणनेला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे, ही कॉंग्रेसची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

खताचा पुरवठा महाराष्ट्राला जसा व्हायला पाहिजे, तसा होत नाहीये. धान खरेदीवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. धान्याची खरेदी करायची असेल तर त्यासाठी परवानगी आणि पैसा हा केंद्र सरकारने द्यायचा असतो. चार लाख मेट्रिक टन उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्याची परवानगी आम्ही केंद्र सरकारकडे मागितली होती. पण केंद्राने फक्त सव्वा लाख धानाचे उत्पादन घेण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. नाफेडने दोन दिवस चना खरेदी केला आणि आता चना खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष राज्य सरकारवर नाही, तर केंद्र सरकारवर आहे, असे नाना पटोले यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in