एकीकडे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांची मत घ्यायची, अन्...

ज्या राजाने (Shivaji Maharaj) आपल्या प्रजेसाठी स्वतःचे सर्व काही दिले, आज त्यांच्याच राज्यात (State)अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे, यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली, असा प्रश्‍नही पाटील यांनी केला.
Shivbhojan Thali Shivaji Maharaj

Shivbhojan Thali Shivaji Maharaj

Sarkarnama

अकोला : महाराष्ट्रभर ज्या-ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) केंद्रामध्ये भ्रष्टाचार उघडकीस येईल, त्या-त्या ठिकाणी केंद्र संचालकांना व दोषींना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली. एकीकडे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) नावावर लोकांची मते घ्यायची आणि त्यांच्या नावावर मात्र जनतेला वेठीस धरायचे ही लाजिरवाणी बाब आहे, असे ते शिवसेनेवर हल्लाबोल करताना म्हणाले.

ज्या राजाने आपल्या प्रजेसाठी स्वतःचे सर्व काही दिले, आज त्यांच्याच राज्यात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे, यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली, असा प्रश्‍नही पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, अशा प्रकारे खोटी कामे करणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देखील घेण्याचा अधिकार नाही, म्हणून अख्या महाराष्ट्रभर ज्या-ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रामध्ये भ्रष्टाचार उघडकीस येईल, त्या-त्या ठिकाणी केंद्र संचालकांना व दोषींना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.

शिवभोजन थाळी केंद्रातील सेवेचा उद्देश कागदावरच राहिल्याचा आरोप करीत, या केंद्राच्या माध्यमातून राज्यभर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रभर शिवभोजन थाळी केंद्र सरकारच्या मानधनावर उघडण्यात आले. प्रत्येक शहरात सर्कल तालुका, जिल्हास्तरावर शिवभोजन थाळी केंद्र उघडण्यात आले. याचा मुख्य हेतू हा गोरगरीब जनतेला कामासाठी शहराच्या ठिकाणी आल्यानंतर पोटभर जेवण मिळावे हा होता. दोन वेळच्या जेवणाची सोय ही अगदी अल्प दरात उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश होता. परंतु सरकारच्या या उद्देशाला केराची टोपली दाखवत जास्तीत जास्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या केंद्रांचे परवाने देण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Shivbhojan Thali Shivaji Maharaj</p></div>
पुणे महानगरपालिका : राग अनावर झाल्याने नगरसेविका कदम भांडल्या आणि मग रडल्या !

याचा परिणाम असा झाला की लोकांना चांगले उत्तम दर्जाचे जेवण फक्त सुरुवातीच्या काळात देण्यात आले. नंतर फक्त ही शिवभोजन थाळी कागदावरच राहिली, असा आरोप संदीप पाटील यांनी केला आहे. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवभोजन थाळीचे जे संचालक आहेत त्यांनीच आपली आर्थिक बाजू बळकट केली आणि शिवभोजन थाळी राहिली ती कागदावर, असेही पाटील यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com