'हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा-रखुमाई'; बच्चू कडू आषाढीदिवशी अपंग, वृद्धांच्या सेवेत

Bacchu Kadu | शेतकरी, अपंग, वृद्ध यांचे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख
Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शेतकरी, अपंग, वृद्ध यांचे नेते म्हणून ओळखले जाते. ते सातत्याने या सर्वांचे प्रश्नासाठी लढतानाही दिसून येतात. आज आषाढीनिमित्त ते पुन्हा एकदा वृद्धांच्या सेवेत दिसून आले. आमदार कडू यांनी आज आषाढी एकादशी निमीत्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृध्दाश्रम येथे भेट दिली आणि वृध्द, अपंगांचे पाद्यपुजन करुन त्यांना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. (MLA Bacchu Kadu Latest News)

आमदार कडू यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. तसेच "हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा रखुमाई" असे म्हणतं आपली आषाढी इथेच साजरी झाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज आषाढी एकादशीनिमीत्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन या वृध्दाश्रम येथे भेट दिली. आमच्यातर्फे आषाढी एकादशीनिमीत्त वृध्द आणि अपंगाना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

आमदार बच्चू कडू मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भुमिकेमुळे चर्चेत आले आहेत. अडीच वर्षांपुर्वी शिवसेनेसोबत गेलेले कडू आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. तसेच आता नव्या मंत्रिमंडळात आपल्याला जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळावं, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागासह बऱ्याच विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com