रणजीत पाटलांच्या मेसेजवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणतात, आधी खात्री करावी !

यावेळीही ती केली जात आहे. अकोल्यातून (Akola) डॉ. रणजीत पाटील (Ranjeet Patil) हे संभाव्य उमेदवार म्हणून या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करीत आहेत.
Akola Ranjeet Patil
Akola Ranjeet PatilSarkarnama

नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार डॉ. रणजीत पाटील हे नव्याने नोंदणी करीत असलेल्या मतदारांना एक मेसेज पाठवीत आहेत. त्यामुळे नवमतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. हा मेसेज दिशाभूल करणारा असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

जसजशी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. पदवीधर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आपापल्या यंत्रणेमार्फत नवीन पदवीधर मतदारांची दरवेळी नोंदणी करीत असतात. त्याप्रमाणे यावेळीही ती केली जात आहे. अकोल्यातून (Akola) डॉ. रणजीत पाटील (Ranjeet Patil) हे संभाव्य उमेदवार म्हणून या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या यंत्रणेमार्फत झालेल्या नव मतदारांच्या नोंदणीनंतर ते मतदारांना एक मेसेज इंग्रजीतून पाठवीत आहेत. हा मेसेज ‘तुमचा मतदार नोंदणीचा फॉर्म शासनाने (State Government) स्वीकृत केला आहे’, अशा आशयाचा आहे.

ज्यांची नावे यादीत नसतील त्यांना पुन्हा त्रुटी पूर्ण करून हा फॉर्म भरावा लागणार आहे. मात्र रणजीत पाटलांचा मेसेजमुळे नव मतदारांना आपली नोंदणी झाली असल्याचा गैरसमज होऊ शकतो, असेही अनेकांचे मत आहे. यासंदर्भात डॉ. रणजीत पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आपण पाठविलेल्या मेसेजमध्ये नोंदणी पूर्ण झाली, असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे संबंधितांचा अर्ज शासकीय यंत्रणेने प्रक्रियेसाठी स्वीकारला असा होतो. आपण कोणतेही गैरकायदेशीर काम कधीच करत नाही, असे त्यांनी सांगितले.

Akola Ranjeet Patil
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडूंचा ‘अकोला पॅटर्न’ देशासाठी ठरणार दिशादर्शक...

नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची यादी प्रकाशित होण्यापूर्वीच मेसेज करून मतदारांना तुमच्या नावाची नोंदणी झालेली आहे, असे सांगणे चुकीचे आहे. मतदारांनी शहानिशा करून घेण्यासाठी मतदार यादी पाहून खात्री करून घ्यावी, असे आवाहन बुलढाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in