Omicronने वाढवली चिंता, अकोल्यात जमावबंदीचे आदेश

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहे.
nima Arora,Akola
nima Arora,AkolaSarkarnama

अकोला : भारतात ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) चार रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता पुन्हा देशाची चिंता वाढली आहे. कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि टांझानियातून आलेल्या दोघांना कोरोना चाचणी केल्यानंतर त्या व्यक्तीला Omicron variant ची लागण झाल्याचे आढळून आले.

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट 'ओमिक्रॉनचा रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर राज्यभरातील आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. ओमिक्रॉन' संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिला.

nima Arora,Akola
राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन अटळ?

ओमिक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यात ५ डिसेंबर पासून मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेश येईपर्यंत शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत रॅली, धरणे,आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही. तसेच जमावबंदीच्या कालावधीत लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही निमा अरोरा यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com