
Yavatmal Teacher's agitation News : मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’चा नारा देत हजारो शिक्षकांनी मोठे आंदोलन केले होते. उपराजधानीचे रस्ते शिक्षकांच्या गर्दीने जाम झाले होते. आता येत्या शिक्षक दिनी जुनी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी शिक्षक एक दिवसाच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत. (Teachers are going on a one-day collective leave)
नागपुरात निघालेला मोर्चा सरकारला धडकी भरवणारा ठरला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत सापत्न भावाची वागणूक देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने येत्या शिक्षक दिनी म्हणजे पाच सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात सर्व शिक्षक सामूहिक किरकोळ रजेवर राहून आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार दिली. राज्यातील इतर सरकारी निमसरकारी कर्मचारी व अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असणाऱ्या शासनाकडून जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांच्या बाबतीत शासन संवेदनशील नाही.
शासनाकडून सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सर्व कर्मचाऱ्यांना व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा, यांसह सेवानिवृत्त शिक्षकांनासुद्धा मासिक २० हजार रुपये मानधनावर अध्यापनासाठी नियुक्ती देण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे प्रशिक्षित टीईटी उत्तीर्ण तरुण शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शिक्षकांच्या (Teachers) जिल्ह्याअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीच्या धोरणात सुधारणेच्या नावाखाली अन्यायकारक बदल केले जात आहेत. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक पदोन्नतीसंदर्भात स्पष्ट धोरण नसल्याने न्यायालयीन (Court) प्रकरणे वाढत आहेत. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त कंत्राटी शिक्षण स्वंयसेवकांची पदे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे.
भविष्यात वेठबिगारी शिक्षक स्वयंसेवक नियुक्तीची पद्धत सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) सर्व शिक्षकांनी न्याय हक्कांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे सामूहिक किरकोळ रजा आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानेश्वर नाकाडे, संदीप मोहाडे, रवींद्र उमाटे, गजानन देऊळकर, किशोर सरोदे, महेश सोनेकर आदींनी केले आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.