Old Pension : महानगरपालिकेसह मेयो, मेडिकलचे कर्मचारी संपावर, रुग्ण सेवा ठप्प !

Medical : मेयो आणि मेडिकलमध्ये काही प्रमाणात कंत्राटी कर्मचारी आहेत.
Old Pension Scheme
Old Pension SchemeSarkarnama

Nagpur News : ‘जुनी पेन्शन’च्या मागणीसाठी आजपासून उपराजधानीतील हजारो कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. महानगरपालिकेत सफाई कर्मचारी आणि अग्निशमन दल वगळता जवळपास सर्वच संपात सहभागी झाले. तर मेयो आणि मेडिकलचेही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्ण सेवा ठप्प झाल्यात जमा आहे.

मेयो आणि मेडिकलमध्ये काही प्रमाणात कंत्राटी कर्मचारी आहेत. पण प्रशिक्षित परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत. जिल्हा परिषदेचे कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. यात महापालिकेच्या जवळपास पाच हजार कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शहरातील सुविधांवर परिणाम होऊन नागरिकांची तारांबळ उडाली आहे. राज्यातील विविध कर्मचारी संघटना, असोसिएशनने जुनी पेंशन योजनेसह विविध मागण्यांसाठी सरकारला संपावर जात असल्याबाबत नोटीस दिली होती. आज संपाबाबत विविध संघटनांचे प्रतिनिधी व मुख्यमंत्री यांच्यातील बैठक फिसकटली. कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी संपावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात कंत्राटी कर्मचारी वगळता जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शिक्षक संघाचे मन वळवण्यात सरकारला यश आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना त्यासाठी मेस्मा लावण्यात आला आहे. परंतु कर्मचारी संपावर ठाम आहे. महापालिकेतील राष्ट्रीय म्युन्सिपल कार्पोरेशन असोसिएशननेही काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेवर परिणाम झाला आहे. परिणामी सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली.

Old Pension Scheme
Old Pension : विधानपरिषदेत पेटला जुनी पेन्शनचा मुद्दा; चर्चा झालीच पाहिजे, म्हणत सदस्य आक्रमक !

जिल्ह्यातील १३ही तालुक्यांत महसूल विभागात लिपिक व इतर संवर्गातील १ हजारावर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परंतु उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यात सहभागी नाही. मंडळ अधिकारी यांचा बाहेरून पाठिंबा असून विदर्भ पटवारी संघ २० तारखेपासून संपात सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन संघटनेकडून देण्यात आले आहे.

रुग्णसेवा सलाईनवर..

काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपात मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी, डागा तसेच आयुर्वेद रुग्णालयातील एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांसह परिचारिका सहभागी झाल्या आहेत. यामुळे येथील रुग्णसेवा सलाईनवर आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जात आहे.

Old Pension Scheme
Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या पक्षालाच मदत करणार १५ कोटी कर्मचारी !

नागपूरच (Nagpur) नव्हे तर मध्य भारतातील विदर्भ, (Vidarbha) छत्तीसगड, मध्य प्रदेश, (Madhya Pradesh) तेलंगणा राज्यातील अत्यवस्थ रुग्ण मोठ्या संख्येने नागपुरातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. शहरातील रुग्णालयात दोन हजारांवर परिचारिका, रुग्णांच्या रक्त- मल- मूत्राच्या तपासण्या करणारे, एक्स रे काढणारे तंत्रज्ञ संपात सहभागी झाले आहेत, असे क्ष-किरण तंत्रज्ञ संघटनेचे सचिव प्रकाश गढे यांनी सांगितले. परिचारिका- तंत्रज्ञ नसल्याने शुश्रूषा विस्कळित झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in