Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलिस उपनिरीक्षक निलंबित...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर नेत्यांबाबत आपत्तीजनक मजकूर पोस्ट करून तेढ निर्माण करणारा भंडारा येथील पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

भंडारा : पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर नेत्यांबाबत आपत्तीजनक मजकूर पोस्ट करून तेढ निर्माण करणारा भंडारा येथील पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबनासोबतच सूर्यवंशी याच्या विरोधात प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

भंडारा (Bhandara) येथे तैनात असलेला पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सूर्यवंशी गंभीर पोस्ट करीत तो नेता, त्यांचे कुटुंबीय सोबतच धार्मिक आयोजनांवर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करत होता. शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुशील चौरसिया यांनी नागपूर जिल्ह्याच्या कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध २९४, २९५ (अ), ५००, ५०४ आणि आयटी ॲक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल केला. ही बाब लक्षात घेता भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलिस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली पोलिस ठाण्यात काम केले आहे. बंगाल आणि पंजाबमध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते.

Narendra Modi
'वाजपेयी, आडवाणींचा पराभव झाला असेल; पण मोदी कधीच पराभूत होणार नाहीत'

फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली होती. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता, परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र आता गुन्हा नोंद दाखल झाल्यानंतर भंडारा पोलिस अधिक्षकांनी त्याला निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in