OBC Vs Atul Save : अतुल सावेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ! ओबीसी समाजाने का केली मागणी ?

Chandrapur OBC Protest : चंद्रपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा
Atul Save
Atul SaveSarkarnama

Chandrapur Political News : सरसकट मराठा समाजातील लोकांना आरक्षणाची मागणी झाल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला, तर आपल्या आरक्षणात वाटेकरी वाढण्याची भीती राज्यभरातील ओबीसी समाजात आहे. त्यामुळे राज्यभर ओबीसी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे. आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाने आता राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Latest Political News)

Atul Save
Pimpri Chinchwad NCP : शरद पवार राष्ट्रवादीत तरुणाईचे नवे पर्व; आता रोहित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणार?

गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Political News)

यानंतर शनिवारी पाचव्या दिवसांपर्यंत प्रशासनाने या आंदोलनाकडे रीतसर काणाडोळा केल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी 'मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू देणार नाही,' असे म्हटले आहे.

मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पाच मे २०२१ मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे. वास्तविक, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे उपोषणाला बसले.

'जरांगेंच्या उपोषणापासून हा मुद्दा पुन्हा एकदा तापला. परंतु जरांगे यांची मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी नसून आम्ही संविधानिक मागणी करीत आहोत,' असे ओबीसी महासंघाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पाहता चंद्रपुरातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

Atul Save
Solapur BJP Executive : दोन्ही देशमुखांच्या मुलांना भाजपचे ‘मानाचे पान’; एकाला शहरात, तर दुसऱ्याला 'ग्रामीण'मध्ये संधी

दरम्यान, मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. तसेच राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या उपोषण मंडपास भेट दिली. मात्र, स्वतः ओबीसींचे मंत्री असतानाही सावे यांनी ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Atul Save
Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे 'फायरब्रॅंड' नेते संजय राऊतांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, ''आमच्यात कितीही मतभेद असो,पण...''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in