OBC : बिहारच्या धर्तीवर मंत्री अतुल सावे करणार ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी प्रयत्न !

Students : विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून १०० करण्याचा सरकार विचार करत आहे.
Atul Sawe, Dr. Babanrao Taywade and Others.
Atul Sawe, Dr. Babanrao Taywade and Others.Sarkarnama

Mumbai OBC convention News : बिहार राज्यात ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांनी ओबीसी बांधवांना दिलासा दिला. (Relief given to OBC people)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे काल हे अधिवेशन पार पडले. यावेळी मंत्री सावे म्हणाले, विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून १०० करण्याचा सरकार विचार करत आहे. बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांनासुध्दा वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे. वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात येईल, असे आश्‍वासनसुद्धा त्यांनी दिले.

राज्य सरकारकडे ३१ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून त्याबाबत एकमुखी ठराव पारित करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायपूरच्या अधिवेशनात जातिनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे. यांसोबतच इतर ठराव करण्याचे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिले.

अधिवेशनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष प्रकाश भांगरथ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार दिगंबर विषे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक अशोक जिवतोडे, भालचंद्र ठाकरे, आमदार वजाहत मिर्झा, शरद वानखेडे, मुकेश नंदन, प्रा. शेषराव येलेकर, गुनेश्र्वर आरीकर, अविनाश लाड, सुभाष घाटे, सुरेंद्र कुमार, महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, ऋषभ राऊत, किसन बोंद्रे, चेतन शिंदे, शाम लेडे, प्रकाश साबळे, उमेश पाटील, प्रकाश पवार आदी सहभागी झाले होते.

Atul Sawe, Dr. Babanrao Taywade and Others.
OBC : सरकार कोणाचेही असो, ओबीसींच्या मागण्या मान्य होणे महत्त्वाचे !

यावेळी राष्ट्रीय ओबीसी (OBC) मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी यांचा सत्कार करण्यात आला, सकाळी ११ वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आझाद मैदान येथे ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी निदर्शने केली. डॉ बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी नेतृत्व केले.

यावेळी राज्यभरातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ, महिला महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ, किसान महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाचे प्रास्ताविक एकनाथ तारमले, संचालन मनोहर मडके यांनी केले. आभार अमर राऊत यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com