OBC : राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे ओबीसी नेत्यांनी केले स्वागत !

Chagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी विधानसभेत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
Dr. Ashok JIvtode
Dr. Ashok JIvtodeSarkarnama

Chandrapur OBC News : इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहांत व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस राज्य सरकारच्या या निर्णयाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी स्वागत केले आहे. (The question of other students was raised)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधानसभेत दिली. ओबीसींचे वसतिगृह केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी उपलब्ध होईल, अशी अट असल्याने अन्य विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांनी केलेल्या सूचना संबंधित खात्याला देण्याचे सांगितले.

वसतिगृहात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना प्राथमिकता दिली जाईल, पण इतरांनाही वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल, असे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. राज्य सरकारने 'ओबीसी', 'व्हीजेएनटी' आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, या केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील, अशी अट घातली होती. अशा स्थितीत अकरावी, बारावी व इतर पदवीधर बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

५४ टक्के ओबीसींना खूप विलंबाने वसतिगृह मिळत आहे. त्यात अशी अट घालून कसे चालणार? ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शहरांत येतात. तेव्हा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनासुध्दा वसतिगृह प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी मागणी होती. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनाही ओबीसी वसतिगृहात प्रवेश मिळेल, अशी माहिती दिली आहे.

Dr. Ashok JIvtode
Nagpur : ...आणि म्हणून महानगरपालिकेच्या थकित ७०० कोटी मिळण्याच्या आशा उंचावल्या !

राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे पदाधिकारी डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok Jivtode) यांनी या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत केले आहे. हा प्रश्‍न खूप वर्षांपासून प्रलंबित होता. ओबीसी नेत्यांनी ही मागणी लावून धरली होती. अधिवेशनामध्ये तसा ठरावही घेण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही घोषणा केल्याने ओबीसी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असल्याचे डॉ. जिवतोडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com