OBC News: सरकार कोणाचेही असो, ओबीसींच्या मागण्या मान्य होणे महत्त्वाचे !

Caste wise census : महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना त्वरित करावी.
Dr. Ashok Jivtode and Other OBC Leaders.
Dr. Ashok Jivtode and Other OBC Leaders.Sarkarnama

Mumbai OBC's Dr. Ashok Jivtode News : ओबीसी समाजाच्या राज्य सरकारशी संबंधित विविध संवैधानिक मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन घेण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरथ यांच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय निदर्शने व राज्यस्तरीय अधिवेशन काल पार पडले. अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व स्वागताध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ होते.

राज्य अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला दहा लाख घरे बांधून देण्याच्या निर्णयासह विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन ओबीसी कल्याणाकरिता अधिक निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले. बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना त्वरित करावी, असे डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) म्हणाले.

सरकार कोणाचेही असो, ओबीसींच्या (OBC) मागण्या मान्य होणे महत्त्वाचे आहे, ओबीसी हिताला अग्रक्रम द्यावा, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok JIvtode) म्हणाले. इतर राज्यांप्रमाणे जुनी पेंशन योजना त्वरित लागू करावी, मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करण्यात येऊ नये, म्हाडामार्फत बांधून देण्यात येणारी घरकुल योजना ओबीसी संवर्गासाठी त्वरित लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्या डॉ. जिवतोडे यांनी केल्या.

Dr. Ashok Jivtode and Other OBC Leaders.
OBC Census In Maharashtra: स्वतंत्र गणनेसाठी समता परिषद झाली आक्रमक!

ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरविण्याकरिता लावण्यात आलेली आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात यावे, गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून वाढवून ती १०० विद्यार्थी इतकी करण्यात यावी, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे त्वरित सुरू करण्यात यावे, एससी व एसटी विद्यार्थ्यांना लागू असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरित लागू करण्यात यावी.

महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयाची तरतूद लवकरात लवकर करून ही योजना कार्यान्वित करण्यात यावी व महाज्योती तर्फे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यात यावे, सामाजिक न्याय विभागातील परिपत्रकानुसार ही प्रशिक्षण केंद्रे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील संस्था चालकांनाच चालविण्यास देण्यात यावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी व या महामंडळाच्या सर्व योजना त्वरित सुरू करण्यात याव्या, यासुद्धा मागण्या करण्यात आल्या.

Dr. Ashok Jivtode and Other OBC Leaders.
OBC Census In Maharashtra: स्वतंत्र गणनेसाठी समता परिषद झाली आक्रमक!

आंदोलनात माजी आमदार दिगंबर विशे, भालचंद्र ठाकरे, प्रा. शेषराव येलेकर, गुनेश्र्वर आरिकर, शरद वानखेडे, सुभाष घाटे, एकनाथ तारमले, प्रकाश साबळे, ऋषभ राऊत, चेतन शिंदे, शाम लेडे, अनिल नाचपल्ले, राजेश काकडे, कल्पना मानकर, शकील पटेल, राजू चौधरी, शिवशंकर खैरे, अर्जुन दले, सुशिलाबाई मोराळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ, वकील महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आदी सहभागी झाले होते.

यानिमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. परिणय फुके, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसींच्या मागण्यांचे विविध ठराव पारीत करण्यात आले. हे ठराव निवेदनासहित राज्य सरकारला पाठविण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com