ओबीसी लढ्याची धार झाली तीव्र; बावनकुळे, वडेट्टीवार, पटोले पुन्हा आले एकत्र...

येथे आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी (OBC) मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा एका मंचावर आले होते. यापूर्वी लोणावळा येथे झालेल्या अधिवेशनात हे नेते एकत्र आले होते.
Nana Patole, Chandrashekhar Bawankule, Vijay Wadettiwar, Babanrao Taywade on OBC
Nana Patole, Chandrashekhar Bawankule, Vijay Wadettiwar, Babanrao Taywade on OBCSarkarnama

नागपूर : ओबीसींचा संवैधानिक वाटा हा ओबीसी लोकांनाच देण्यात यावा. यातून इतरांना तो देऊ नये, असा गंभीर इशारा आमदार नाना पटोले यांनी दिला. ते कामठी तालुक्यातील गादा या गावी आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा महाअधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आमदार नाना पटोले, (Nana Patole) आमदार चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) पुन्हा एका मंचावर आले होते. यापूर्वी लोणावळा येथे झालेल्या अधिवेशनात हे नेते एकत्र आले होते. याशिवाय सर्वपक्षीय आमदार, माजी आमदारांनी उपस्थिती लावल्यामुळे ओबीसी लढ्याची धार तीव्र झाली, अशा प्रतिक्रिया उमटल्या.

पटोले पुढे म्हणाले की मी या कार्यक्रमात एक ओबीसी (OBC) चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे, काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष किंवा इतर संवैधानिक पदे ही ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढण्याकरिता आहेत. या वर्षीपासून ओबीसींचे वसतिगृह सुरू व्हायलाच पाहिजे. तसेच आता ओबीसींनी खासगीकरणाला कडाडून विरोध करणे गरजेचे आहे. कारण आरक्षण हे खाजगी उपक्रमाला लागू होत नाही. आम्हा ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकीय असे आरक्षण हवे आहे. ते मिळविण्यासाठी ओबीसींनी डॉ. तायवाडे यांच्या नेतृत्वात संघटित होऊन आपला संघर्ष तीव्र करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महासंघामुळे मिळाली ओळख..

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले राज्याच्या ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला ओबीसी नेता म्हणून ओळख ही राष्ट्रीय ओबीसी महासंघामुळे मिळाली. मी ओबीसी चळवळीशी सुरुवातीपासून जुळलो आहे. ओबीसींनी त्यांच्या हितासाठी लढणा-यांच्या सोबत रहावे. आता महाराष्ट्र राज्याने ओबीसींचे संवैधानिक आरक्षण १०० टक्के लागू करून आपली ओळख देशात एक आदर्श राज्य म्हणून निर्माण करावी. या देशातील मिडिया हा ओबीसींसह सर्वसामान्य लोकांच्या समस्येवर एखादी साधी चर्चा किंवा डिबेट न करता निव्वळ धार्मिक व जातीय तणावावर दिवसभर चर्चा रंगविते. तुमच्या वादविवादात ओबीसी कुठे आहे, असा परखड सवालही त्यांनी केला. ओबीसींना त्यांचे संवैधानिक हक्क मिळविण्यासाठी सनसनी निर्माण करावी लागेल. यासाठी ओबीसींना एकजूट होण्याचे भावनिक आव्हान वडेट्टीवार यांनी केले. राज्य सरकारने जर ओबीसी वसतिगृहाचा प्रश्न सोडवला नाही, तर तो महाज्योतीच्या माध्यमातून सोडविण्यात येईल, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

राज्य आणि केंद्राकडे समस्या पोहोचल्या पाहिजे..

राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की डॉ. तायवाडे यांनी ओबीसींच्या न्यायहक्काच्या लढाईसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. सर्व स्तरांतील लोकांना सोबत घेऊन ते हा लढा लढत आहेत. ओबीसींच्या समस्या या केंद्र आणि राज्य सरकारकडे पोहोचल्या पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून संघटित होऊन संघर्ष निर्माण केला पाहिजे. सरकारला चाहूल लागताच ते याबाबत विचार करून मागण्या मंजूर करतील. तसेच जनगणना आदी न्यायिक अडचणी मार्गी लावण्यासाठी संविधानात आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधानसभा या ओबीसींच्या बहुमताचे असणे गरजेचे आहे. ओबीसी लोक संघटित होऊन हे साध्य करू शकतील, तसेच राजकीय आरक्षण टिकावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Nana Patole, Chandrashekhar Bawankule, Vijay Wadettiwar, Babanrao Taywade on OBC
मोठी बातमी : ओबीसी महामंडळाच्या कर्ज वसुलीस स्थगिती : मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात डॉ. बबनराव तायवाडे यांनी संवैधानिक कलम ३४० ची पार्श्वभूमी विशद करीत ओबीसी आरक्षणाची परीपाठी सांगितली. ओबीसींचे आरक्षण हे संवैधानिक व कायदेशीर आहे. ते संपूर्ण क्षमतेने लागू करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण त्यासाठी आम्हा ओबीसींना आंदोलन करावे लागते. महाज्योतीतर्फे चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार टेकचंद सावरकर यांचीही भाषणे झालीत. यावेळी व्यवसायी प्रभाकर देशमुख, सुरेश गुडधे, गणेश नाखले, राजेंद्र वानखेडे, नरेश बरडे, विनोद उलीपवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी महामानवांच्या संयुक्त प्रतिमांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून या जिल्हा महाअधिवेशनाचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष राजेश काकडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन परमेश्वर राऊत व मंगेश सातपूते यांनी संयुक्तपणे हाताळले. प्रास्ताविक राजेश राहाटे यांनी केले. राष्ट्रीय युवा आघाडीचे अध्यक्ष सुभाष घाटे यांनी भूमिका मांडली. आभार अनिता ठेंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, सुषमा भड, अॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, प्रदीप वादाफळे, शकील पटेल, विजय पटले, विजया धोटे, अॅड.पुरूषोत्तम पाटील, आनंता भरसाकळे, आशिष तायवाडे, चंद्रकांत हिंगे, संजय मांगे, रोशन कुंभलकर, निलेश कोढे, शुभम वाघमारे, मयूर वाघ, अनील गुजरकर, राजु चौधरी, निशा खडसे, वृंदा ठाकरे, साधना बोरकर, रूतिका डफ, प्रीती राऊत, उज्ज्वला महल्ले, विद्या सेलोकर, सायली धोटे, दिपाली गुडधे, नयना झाडे, ज्योती काकडे, मंगला देशमुख, राजू मोहोड, पराग वानखेडे, अनील बावनकुळे, गोविंद वरवाडे, नामदेव भुयारकर, खुशाल शेंडें, सुधाकर तायवाडे, डॉ. विजय धोटे, लक्ष्मीकांत किरपान, चंद्रशेखर अरगुलेवार, शुभम केदार यांनी परिश्रम घेतले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com