NVCC : माजी अध्यक्षाच्या तक्रारीवरून विद्यमान अध्यक्षावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Nagpur : दिपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Dipen Agrawal, Nagpur.
Dipen Agrawal, Nagpur.Sarkarnama

Nag Vidarbha Chembrs of Commerce : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्समध्ये (एनव्हीसीसी) पदाधिकाऱ्यांच्या भानगडी अजूनही सुरू आहेत. माजी अध्यक्ष दिपेन अग्रवाल आणि विद्यमान अध्यक्ष अश्‍विन मेहाडिया यांच्यातल्या संघर्षातून आतापर्यंत अनेक भानगडी झालेल्या आहेत. आता अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मेहाडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या राडा प्रकरणानंतर माजी अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता अध्यक्षांकडून पदाचा दुरुपयोग करीत, खोटी कागदपत्रे आणि बनावट बैठकांच्या मिनिट्सच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेतल्याच्या दिपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ साली अश्‍विन मेहाडिया एनव्हीसीसीच्या अध्यक्षपदी निवडून आले. मात्र, त्यांचा डायरेक्टर आयडेन्टीफिकेशन नंबर रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीने ब्लॉक केला.

त्यामुळे ते अपात्र झालेत. असे असतानाही त्यांनी ही बाब एनव्हीसीसीपासून लपवून निवडणूक लढविली. त्यानंतर त्यांनी ‘सर्टीफिकेट ऑफ ओरिजिन ३’ संघटनेशी संबंध नसलेल्या मेहूल शाह याला दिले. त्यासाठी त्यांनी ३०० ऐवजी १०० रुपये घेतले.

सहमती असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी बनावट झूम बैठक आणि कागदपत्रे तयार केलीत. तसेच संस्थेचे लेटरहेड, सील, स्टॅम्प वापरले. याशिवाय १०० कोटीची जमीन असताना, २०२१ साली त्यांनी दोन कोटी रुपयांची जागा आणि अडीच कोटी रुपयांचे धनादेश एनव्हीसीसीला मिळवून दिले.

Dipen Agrawal, Nagpur.
Nagpur : ‘गरुडा’ने परवा मागितले होते पुरावे, किशोर गजभियेंनी आज पत्रकारांसमोर सादर केले !

यावेळी सदस्यांना न्यायालयाची (Court) भीती दाखवीत या व्यवहारात कोट्यवधींचा अपहार करीत एनव्हीसीसीची फसवणूक केली. त्यानुसार दिपेन अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी (Police) अश्‍विन मेहाडिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

बैठकीतही झाला होता राडा..

१७ डिसेंबर रोजी झालेली आमसभा तसेच निवडणुकीवरून (Election) आजी व माजी पदाधिकाऱ्यांत संघर्ष‌ उफाळला होता. त्यातून दिपेन अग्रवाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रेकॉर्डिंग करता यावे, म्हणून माजी अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी मुकेश सगलानी व त्यांच्या चमूला बोलावले. रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर अश्विन मेहाडिया यांनी शिवीगाळ करून धमकावले आणि रेकॉर्डिंग बंद पाडल्याची तक्रार दिपेन अग्रवाल यांनी दिली होती. त्यातून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com