आता ‘भूत’ आणि ‘पंचमहाभूत’ करणार काय विकास, आमदार कुटेंचा सवाल...

त्यांनी (MLA Dr. Sanjay Kute) खरपूस समाचार घेतला. कुठलेही व्हिजन न ठेवता फक्त कॉमेडी करून शहराचा विकास होत नाही, अशी टिकाही त्यांनी केली.
Sanjay Kute at Sangrampur Election

Sanjay Kute at Sangrampur Election

Sarkarnama

संग्रामपूर : भूत, पंचभूत विकास करतील काय? की बाहेरचे येऊन विकास करतील, विकास फक्त संग्रामपूरची जनताच करेल, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. संजय कुटे (Sanjay Kute) यांनी व्यक्त केली. महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे ‘भूत’ आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे ‘पंचमहाभूत’, याचा काल रात्री केलेल्या भाषणात त्यांनी खरपूस समाचार घेतला. कुठलेही व्हिजन न ठेवता फक्त कॉमेडी करून शहराचा विकास होत नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

उद्या नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेतून कुटे यांनी दोन्ही मंत्र्यांना टोला लगावला. संग्रामपूर नगर पंचायतीची निवडणूक (Election) सुरू असून भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहे. नगर पंचायतीच्या 12 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी व प्रहार पक्षाची जाहीर सभा झाली. त्यामध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमच्या जिल्ह्यातील ‘भूत’ येतेय, तर मंत्री बच्चू कडू यांनी आम्ही ‘पंचमहाभूत’ आहोत, असे आरोप-प्रत्यारोप एकमेकांवर केले होते.

आमदार डॉ. संजय कुटे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. या मतदार संघाचा मी सक्षम आमदार असून मला ज्या जनतेने निवडून दिले, ती जनता सक्षम असताना नगरपंचायतीच्या विकासासाठी कोणी बाहेरील भूत पंचमहाभूतांची गरजच काय, असा सवाल यावेळी आमदार कुटे यांनी उपस्थित केला. विकासाची भाषा न करता कॉमेडीतून विकास होईल का, असा ही प्रश्न यावेळी त्यांनी केला. भूत व पंचभूत यांनी फक्त टाळ्या घेण्यासाठी भाषणे केलेली दिसतात. संग्रामपूर नगर पंचायतचा जळगाव व शेगावसारखा विकास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Sanjay Kute at Sangrampur Election</p></div>
विरोधी पक्ष सोडला तर मुख्यमंत्र्यांचे कुणीच ऐकत नाही- संजय कुटे

मागच्या पाच वर्षात संग्रामपूर शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता, तो झाला नसल्याने यावेळी स्वतः पुढाकार घेऊन रणांगणात उतरावे लागले, असेही आमदार कुटे म्हणाले. डोळ्यासमोर व्हिजन ठेवून या निवडणुकीला प्राध्यान्य दिले आहे, शेगाव तसेच जळगाव जामोद शहराचा ज्या प्रकारे सर्वांगीण विकास झाला, त्याच धर्तीवर संग्रामपूर शहराचा विकास करायचा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com