Vidarbha : आता सुरू झाला पूर्व विदर्भ विरूद्ध पश्‍चिम विदर्भाचा वाद...

East and West Vidarbha : विदर्भातील मागासलेपणावर सर्वच राजकारणी चवीने रवंथ करतात.
Vidarbha
VidarbhaSarkarnama

Disput between East and West Vidarbha : विदर्भातील मागासलेपणावर सर्वच राजकारणी (Leaders) चवीने रवंथ करतात. मात्र, प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ येते तेव्हा मात्र पूर्व विदर्भावरच (Vidarbha) अधिक मेहरबानी होते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पूर्व विदर्भातील धान उत्पादकांसाठी दिवसा थ्री फेज १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचा आदेश ३० नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने (State Government) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला (महावितरण) दिला आहे.

हा आदेश देताना आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसह वर्धा (Wardha) जिल्ह्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने पूर्व विरुद्ध पश्चिम विदर्भ हा भेदभाव पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आला. वैधानिक विकास मंडळांच्या अहवालांमध्ये पश्चिम विदर्भाच्या अनुशेषाबाबत वारंवार उल्लेख आला आहे. त्याची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही. सिंचन असो वा रस्ते विकास कधीही पश्चिम विदर्भाला प्राधान्य तर सोडा पण बरोबरीचा वाटाही मिळालेला नाही. शेती विकासाच्या मुद्दा पुढे येतो तेव्हाही पश्चिम विदर्भातील अमरावती, (Amravati) यवतमाळ, अकोला, (Akola) बुलढाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात येणाऱ्या वर्धा जिल्ह्यावरही सातत्याने अन्याय होत आला आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून या सहा जिल्ह्यांची नोंद झाली. त्यात शासनाने आणखी भर टाकत रब्बीत पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून दिली आहे. ही वीज धान उत्पादक चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व भंडारा या पाच जिल्ह्यांना उपलब्ध होणार आहे. पश्चिम विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर बागायती आहे. याशिवाय रब्बीतील पिकांसाठीही सिंचन आवश्यक असते. त्यासाठी वीज पुरवठा आवश्यक आहे. मात्र, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील कृषी पंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात नाही. एक तर रात्रीच्या वेळी किंवा सकाळी व सायंकाळच्या सत्रात वीज पुरवठा होतो. हा या शेतकऱ्यांवर अन्यायच आहे.

Vidarbha
Prashant Kishor : मागणीचा रेटा रचनात्मक पद्धतीने पुढे नेल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य शक्य...

सध्या प्रचंड थंडी आहे. त्यातच रात्रीच्या वेळी वन्य प्राणांचा त्रास होतो. जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करताना पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घ्यायला हवी होती. तसे न झाल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना वृद्धिगंत होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी कोण पुढाकार घेणार?

- प्रा. डॉ. संजय खडक्‍कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com