Buldhana news|आता महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी

Buldhana news| पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्यासाठी तालुकानिहाय अर्ज स्विकृतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Buldhana news|
Buldhana news|

बुलडाणा : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आधी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. हे ऑनलाईन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी जात प्रमाणपत्र पडताळणीचे (Caste Certificate Verification) अधिकारी महाविद्यालयात येऊन करणार आहेत, अशी माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी दिली आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकृती करणे, त्यामधील तृटी पुर्तता आणि ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल. यासाठी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्यासाठी 13 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत तालुकानिहाय अर्ज स्विकृतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Buldhana news|
Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

तर दुसऱ्या टप्प्यात 19 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी, कर्मचारी तालुकानिहाय महाविद्यालयात जाऊन अर्ज स्विकृतीचे कार्य करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्य़ांनी आणि इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या bartivalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याची प्रत घ्यावी. या प्रतीसोबत मुळ आवश्यक कागदपत्रांसह तयार ठेवावेत, असे आवाहन उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com