आता शिवसैनिकांना करायचेय नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण…

भोंगे आणि हनुमान चालिसा पठण यांवरून महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण तापलं आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.
आता शिवसैनिकांना करायचेय नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण…
MaharashtraSarkarnaman

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सुरू केलेले हनुमान चालिसा पुराण काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर मुंबई विभागाच्या कार्याध्यक्ष फहमीदा हसन खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं. आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांना पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करायचे आहे.

भोंगे आणि हनुमान चालिसा पठण यांवरून महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण तापलं आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत (Mumbai) हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर हनुमान चालिसा, नवकार मंत्र, गुरूग्रंथासह नमाज पठण करण्यासाठी फहमीदा हसन खान परवानगी मागितली आहे. दिवस आणि वेळ आपण सांगावे, असंही त्यात म्हटलं आहे. त्यामुळे आता यावरूनही राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसैनिकांनीही भर टाकली आहे. आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देवेंद्र गोडबोले यांनी केली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण केल्यामुळे महाराष्ट्रावरील साडेसाती दूर होऊन समृद्धी होणार असेल तर, आम्हीही पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करू आणि देशावर सातत्याने ओढावत असलेली संकटं दूर करण्यासाठी प्रार्थना करू. आमच्या हनुमान चालिसा पठणामुळे देशाचे भले होत असेल तर आम्ही ते नक्की करू आणि त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, असेही गोडबोले यांनी म्हटले आहे.

Maharashtra
हनुमान चालिसा आणि भोंग्याचे राजकारण बघून खंत वाटते…

शिवसैनिक माझ्या घरी हनुमान चालिसा पठण करायला आले, तर मी त्यांचे स्वागतच करीन, असे भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पण राणा दाम्पत्याने राज्याचे प्रथम नागरिक उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टहास केला होता. आमचा अट्टहास नाही, पण आम्हालाही देशाच्या प्रथम नागरिकाच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी मिळावी, अशी शिवसैनिकांची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.