MVA : आता नागपूर शिक्षक कॉंग्रेस, तर नाशिक पदवीधर शिवसेना लढवणार?

Shivsena : शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांनी अर्ज दाखल केल्यापासून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू झाली होती.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

Nagpur Teacher and Nashik Graduate Constituency Elections : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू झाली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे उमेदवार बदलण्याची मागणीही केली होती. आता ही मागणी पूर्ण होण्याची वेळ आली आहे, असं आज सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसतंय.

नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवक कॉंग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष नामांकन दाखल करून ट्विस्ट आणले होते. तेव्हापासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर आज मातोश्रीवर नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) धुळे येथील शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत खल सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील, असे मानले जात आहे.

शुभांगी पाटील यांना मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत पाचारण करण्यात आले आहे. थोड्याच वेलात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तांबे यांना कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस पाठिंबा देणार नाही, असे नाना पटोले यांनी कालच घोषित केले.

अपक्ष नामांकन दाखल केलेल्या तांबे यांनी सर्व पक्षीयांचा पाठिंबा मागणार असल्याचे अर्ज सादर केल्यानंतर घोषित केले होते. त्यानंतर तांबेंना भाजप पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी अद्याप तांबेंनी आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही आणि ते आमच्याकडे आले तरी हा विषय आधी पार्लमेंटरी बोर्डाकडे जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. तरीही भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देईल, असे मानले जात आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aaghadi: राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार? राष्ट्रवादीच्या आमदाराने दिले मोठे संकेत

आज सुरू असलेल्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील आणि त्यातल्या त्यात कॉंग्रेसचा नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटणार असं दिसतंय. कारण नाशिकमध्ये शिवसेना पाठिंबा देत असलेला उमेदवार महाविकास आघाडीकडून लढणार असेल, तर नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा, हा प्रश्‍न उपस्थित केला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे नागपूरची जागा आता कॉंग्रेससाठी सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास कॉंग्रेस पाठिंबा कुणाला देणार, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com