आता असा कोणता डॉक्टर मिळाला की, ठाकरे ठणठणीत झाले; बावनकुळेंनी घेतला समाचार...

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhr Bawankule) यांनी आज चांगलाच समाचार घेतला.
Chaandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chaandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySaarkarnamaa

नागपूर : आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही. त्यामुळे आणखी अधोगती होईल, उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, त्यांनाच त्यांची चूक लक्षात येईल, असे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपने (BJP) नेहमीच आपल्या मित्र पक्षाची काळजी घेतली, त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापर्यंत सर्वांनीच मित्रपक्षांना मदत केली आहे.

उद्धव ठाकरे यांना मदत केली तेव्हा भाजप चांगला होता. आता त्यांच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप त्यांना वाईट दिसत आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांच्या जाळ्यात अडकू नका, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी ठाकरेंना दिला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने अठरा महिने विधिमंडळात, मंत्रालयात नव्हते. आता असा कुठला डॉक्टर मिळाला की मास्कशिवाय फिरत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घेण्याच्या आव्हानावरही बावनकुळे यांनी टिका केली. राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत गेले, तेव्हा का नाही निवडणूक घेण्याचे सुचले. निवडणुकीत जनतेला सामोरे जायला हवे होते, त्यानंतर राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत जायचे होते.

Chaandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
बावनकुळे म्हणाले, महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ...

आता शिवसेना, भाजप युतीत लढलेले आमदार एकत्र आले अन् जनतेचा जो कौल होता, त्यानुसार सरकार अस्तित्वात आले. हे सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आमदारांना योग्य वागणूक दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यांना योग्य वागणूक दिली असती तर हे दिवस नसते आले. अडीच वर्षातील कारस्थानांमुळे आमदार, खासदार कंटाळले अन् भाजपसोबत आले, अशी टीकेची झोड आमदार बावनकुळेंनी उठवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in