Shiv Sena : आता 'यासाठी' शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुंडण करणार...

शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी तेथे भेट दिली. रस्ता झाला नाही, तर मुंडण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासनाला दिला.
Shivsena Agitation
Shivsena AgitationSarkarnama

नागपूर : तालुक्याच्या टोकावर असलेल्या सुर नदीच्या काठावरील महालगावच्या शेतकऱ्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर शेती असल्यामुळे नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण होते. हे लक्षात घेता शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी तेथे भेट दिली. रस्ता झाला नाही, तर मुंडण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासनाला दिला.

महालगाव येथील शेतकऱ्यांची ९० टक्के शेती सुर नदीच्या पालीकडे असल्यामुळे पावसाळ्यात नदीच्या पलीकडे शेतातील कामे करण्यास व शेतात जाण्यास अडचण येत आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना (Farmers) शितापार किंवा दुसऱ्या गावाला जाता येत नाही. मागील काळात अनेक नेते येऊन लोकांना आश्वासन देऊन गेले. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. जर याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष दिले नाही तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पुढील काळात मुंडण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासनाला दिला.

गोडबोले यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची बैठक..

महालगाव येथील शेतकऱ्यांनी सुर नदीतून जाण्याकरिता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरवर्षीपेक्षा यावर्षी नदीला मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे नदीला भरपूर पाणी येत आहे. नदीला कमी पाणी असते, त्यावेळी शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात. याकरीताही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बैठकीला महालपावचे नरेश मोहतुरे, उपसरपंच रोहित बोरकर, खातचे उपसरपंच अरविंद तांबुलकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष जगदीश कडव, राजू वैद्य, प्रभू धोत्रे, दामोदर गाढवे, मनोहर मेश्राम बालू मते, आनंद बांते, अतुल भोयर, संदीप भोयर, रामजी मेंघरे, धनराज मोहतुरे, चंद्रमणी चव्हाण, सुधाकर मोहतुरे संपूर्ण गावकरी उपस्थित होते.

रस्त्यासाठी जाळही होती खुर्ची..

मौदा तालुक्यात प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रबडीवाला ते केसलापूर रस्ता पूर्णपणे खोल खड्डे पडले आहेत. रोज कोणीतरी दुचाकीस्वार पडत असतात. नवेगाव येथील पूल मागील चार वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. त्याठिकाणी आतापर्यंत अपघातात ४ मुलांनी जीव गमावला आहे. रामटेक मौदा रस्त्यावर रोज हजारो लोक प्रवास करतात सदर रस्ताही पूर्णपणे नादुरुस्त आहे. रात्री-बेरात्री कंपनीत कामाला येणारे अनेक कामगार पडून दुर्घटना घडल्या आहेत. एकंदरीत पूर्ण तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेकदा यावर आंदोलन करूनही माजलेले अधिकारी लक्ष देत नाही, सरकार निधी देत नाही. मंत्र्याचे दौरे असले की थातूर मातुर मलमपट्टी करण्यात येते. पण सामान्याच्या विचार कोणी करत नाही.

Shivsena Agitation
नागपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण नव्याने काढावे - देवेंद्र गोडबोले

देवेंद्र गोडबोले यांनी सार्वजनिक विभाग कार्यालयावर धडक धडक देऊन अभियंता खोब्रागडे यांना बेशरमच्या फुलाचा गुलदस्ता देऊन सत्कार केला व प्रतीकात्मक खुर्ची जाळून निषेध नोंदविला होता. तसेच रस्त्याची सुधारणा झाली नाही तर पुन्हा आंदोलन उभारून अधिकाऱ्याचे तोंड काळे केले जाईल, असा इशाराही दिला होता. आता प्रतीकात्मक खुर्ची जाळली पुढच्या वेळेस अधिकाऱ्याची खुर्ची जाळू, असाही इशारा यावेळी देवेंद्र गोडबोले यांनी दिला होता. आता रस्त्याच्याच प्रश्‍नावर त्यांनी मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com