एकनाथ शिंदे नव्हे, तर बच्चू कडू उद्या जाणार मुंबईला! अविश्‍वास प्रस्ताव देणार?

राज्यपालांना (Governor) भेटून सरकारने ४८ तासांत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी बच्चू कडू (Bacchu Kadu) करणार असल्याचे सूत्र सांगतात.
Uddhav Thackeray, Bacchu Kadu and Eknath Shinde
Uddhav Thackeray, Bacchu Kadu and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : तब्बल आठवडाभरापासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहे. आज दुपारी ते पहिल्यांदा प्रसार माध्यमांसमोर आले. उद्या मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण आता ते नाही तर प्रहारचे बच्चू कडू उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यपालांना (Governor) भेटून सरकारने ४८ तासांत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी बच्चू कडू (Bacchu Kadu) करणार असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे या बंडाळीमध्ये उद्या महत्वपूर्ण घडामोडी होण्याची दाट शक्यता आहे. बच्चू कडू यांच्यासोबत त्याचे सहकारी काही अपक्ष आमदारही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत अमावस्या आहे. भाजप (BJP) उद्या राज्यपालांकडे अविश्‍वासाचे पत्र देऊ शकते. पण भाजप नेते सध्या पुढे येण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यासाठी ते दुसरा मार्ग निवडू शकतात.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे ते अविश्‍वासाचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. त्यामुळे मग भाजपला पुढे येण्याची गरज नाही. शिवसेनेचे आमदार जर आले तर त्यांना हिंदुत्व महत्त्वाचं होतं की सरकार पाडणं महत्त्वाचं होते, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच बच्चू कडूंसोबत अपक्ष आमदार असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्या मागणीनंतर फ्लोर टेस्ट झाली तर भाजप आपलं संख्याबळ दाखवू शकते. आणि त्याचे संख्याबळ जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व प्रक्रिया अमावस्येकरता थांबली असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे उद्या सकाळी ८.३० वाजतानंतरच्या घडामोडी महत्वाच्या राहणार आहेत.

Uddhav Thackeray, Bacchu Kadu and Eknath Shinde
Video: राजकारणात फोडाफोडी करावीच लागते; बच्चू कडू

मला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे आर्शीवाद आहेत. त्यांचेच हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचे लोक शिवसेना संपवण्याचे काम करीत आहेत. हे आम्हाला पटलं नाही. म्हणून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. हे बंड नाही, तर ही मोहीम आहे आणि ही मोहीम आम्ही सर्व मिळून नक्कीच फत्ते करू, असे एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे आता सत्ता स्थापनेची घडी निकट आली असल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळ उद्धव ठाकरेंसोबत..

परवा परवापर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी चर्चा होती. पण नंतर त्यांनी संघर्ष करण्याचे ठरवले. या सत्ता संघर्षात राज्याचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचा निर्णय एकमताने आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सर्व राज्यमंत्र्यांनाही बोलावण्यात आले होते. या सत्तासंघर्षात लढायचे आणि फ्लोर टेस्टला सामोरे जाण्याचेही आज ठरले. या नाट्यात उद्या वेगवान घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com