समृद्धी महामार्गावरून माझं नाव कुणीही मिटवू शकत नाही !

एका गोष्टीचा अधिक आनंद आहे की, जो लोक तेव्हा या रस्त्याला विरोध करीत होते, तेच आता या महामार्गाचे उद्घाटन करीत आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis statement on Samruddhi Project
Devendra Fadanvis statement on Samruddhi ProjectSarkarnama

नागपूर : समृद्धी (Sumruddhi HIghway) महामार्ग सुरू झाला पाहिजे. आपल्या राज्यातील हे काम पूर्ण होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. पण सगळी कामं पूर्ण करून उद्घाटन केलं पाहिजे, कारण या रस्त्याचे महत्व वेगळे आहे आणि कुणी काहीही केले तरी या रस्त्यावरून माझे नाव कुणीही मिटवून शकत नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज येथे म्हणाले. (Devendra Fadanvis on Samruddhi Project)

फडणवीस म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी (Mahavikas Aghadi Government) उद्घाटनाची घाई करू नये. कारण या रस्त्याची काही काम अपूर्ण आहेत, ती आधी पूर्ण करावी आणि त्यानंतर उद्घाटन केलं तर अधिक चांगले होईल. आत्ता घाईघाई उद्घाटन केले तर हा मार्ग सुरू होऊ शकेल, पण या रस्त्याला वेगळे महत्व आहे. त्यामुळे कामे पूर्ण होण्याआधी उद्घाटन करू नये. मात्र कधीही उद्घाटन झाले, तर त्याचे स्वागतच आहे.

मुंबई मेट्रोचे उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीसांना त्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि आता समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमातही त्यांना बोलावण्याची शक्यता कमीत दिसत आहे. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, या मार्गाची संकल्पना गेल्या २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. पण हे माझं एकट्याचं श्रेय नाही. जनतेने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. त्यामुळे हे मोठे काम मी करू शकलो. एका गोष्टीचा अधिक आनंद आहे की, जो लोक तेव्हा या रस्त्याला विरोध करीत होते, तेच आता या महामार्गाचे उद्घाटन करीत आहेत.

Devendra Fadanvis statement on Samruddhi Project
Video: आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण...; देवेंद्र फडणवीस

गोंदिया गडचिरोलीपर्यंत जाणार समृद्धी..

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली हा भाग नक्षलवादी, दुर्गम व आदिवासी भाग आहे. या भागात रस्त्यांचे जाळे पोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते गडचिरोली हा समृद्धी महामार्ग तीन टप्प्यांत होणार आहे. यात नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया व गोंदिया ते गडचिरोली असे टप्पे असतील. या तीनही टप्प्यातील कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) आणि हा रस्ता तीन राज्यांतून जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com