Mungantiwar : राजीनाम्याची गरज नाही, मुख्यमंत्री अब्दुल सत्तारांना सूचना देतील !

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत टीका केली. तेव्हापासून राज्यातील वातावरण तापले आहे.
Sudhir Mungantiwar, Abdul Sattar, Supriya Sule and Eknath Shinde.
Sudhir Mungantiwar, Abdul Sattar, Supriya Sule and Eknath Shinde. Sarkarnama

Abdul Sattar नागपूर : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत टीका केली. तेव्हापासून राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, तर काही आक्रमक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या काचाही फोडल्या. सत्तारांच्या वक्तव्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, असे काही झाल्यानंतर मंत्र्याचा राजीनामा घेण्याची पद्धत स्वातंत्र्यानंतर आजतागायत अस्तित्वात नाही. यासंदर्भात जी काही चूक झाली, ती सुधारली गेली पाहिजे. सत्तारांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी त्यांनी भलेही करावी. पण थेट राजीनामा देण्याची मागणी म्हणजे जरा अतीच झालं. अशाने तर हा पायंडा पडून जाईल. त्यामुळे राजीनाम्याची मागणी योग्य नाही, असे ते म्हणाले.

ही पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. अशी पद्धत बदलवायची असेल, तर त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. या प्रकरणात मी अधिक बोलणे योग्य नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांना योग्य त्या सूचना देतील. शिंदे त्यांच्याकडे विचारणा करतील, त्यांच्याशी बोलतील, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले. पण हल्ली कोण कोण काय काय बोलतं, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. लोक एखाद्याबद्दल बोलताना किती खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. पण त्याची कधी वाच्यता होत नाही आणि बातमीही होत नाही. यासंदर्भात कायदा करायचा असेल, तर कायदाही केला पाहिजे, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar, Abdul Sattar, Supriya Sule and Eknath Shinde.
Aurangabad : अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबद्दल काढले अपशब्द..

अब्दुल सत्तारांनी मनुवाद स्वीकारला असा आरोप आता त्यांच्यावर होऊ लागला आहे. या बाबतीत विचारले असता, जे आता मनुवादाबाबत सांगत आहेत, त्यांच्याच पक्षाचे अजित पवार त्याच पक्षासोबत येऊन ३६ तास राहिले होते. त्यामुळे राजकारण करताना अशा गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाही. तेव्हा तर ते परत गेले, पण पुन्हा केव्हा परत येतील, हेदेखील सांगता येत नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला हाणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in