NMC News : पिंपरी-चिंचवड अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागपूर मनपा ॲक्शन मोडवर...

Nagpur : तीनशे होर्डिंग्ज धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
Hoardings in Nagpur
Hoardings in NagpurSarkarnama

Nagpur Municipal Corporation issued a notice to the concerned : शहरातील २६५ अवैध होर्डिंग्ज नागरिकांच्या जिवाला धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावली आहे. शहरात अकराशे होर्डिंग्ज असून त्यातील तीनशे होर्डिंग्ज धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘सरकारनामा'ने दिले होते. त्याची दखल घेत महापालिकेने अवैध होर्डिंग्जच्या एजन्सींवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. (The process of action against the hoarding agencies has been initiated)

पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. त्यानंतर राज्यभर या घटनेची दखल घेण्यात आली. नागपूर महानगरपालिकेने पिंपरीची घटना घडल्यानंतर तातडीने अवैध होर्डिंग्ज वर कारवाईचा बडगा उगारला होता.

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागपुरातील एजन्सी रडारवर आल्या आहेत. दर तीन वर्षांनी होर्डिंग्जच्या सुस्थितीबाबत महापालिकेकडे एजन्सीधारकांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु एजन्सीधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने होर्डिंग्जच्या सुस्थितीबाबत शंका उपस्थित झाली होती. पावसाळ्याच्या तोंडावर जोरदार वादळात होर्डिंग कोसळल्यास पिंपरी-चिंचवडप्रमाणे (Pimpri-Chinchwad) मोठा अपघात होण्याची शक्यताही आहे.

शहरातील इमारतींवर, रस्त्याच्या फुटपाथवर लावलेल्या होर्डिंग्जमध्ये २६५ होर्डिंग हे अवैध असल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. विशेष म्हणजे ज्यांनी होर्डिंगसाठी परवानगी घेतली आहे, त्यातील हे होर्डिंग्ज आहेत. जे परवानगी न घेता होर्डिंग लावतात, त्यांची संख्या आणखी जास्त आहे.

Hoardings in Nagpur
Nagpur BJP News : गडकरी आणि फडणवीसांसोबत उत्तम ताळमेळ, प्रवीण दटकेच राहणार भाजपचे अध्यक्ष ?

या होर्डिंग्जवर कारवाईची अनेक कारणे आहेत. जमिनीपासून १० फूट उंचीवर होर्डिंग लावलेले नाही. फुटपाथवरील होर्डिंगची उंची ४० फुटांवर आहे. होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, बिल्डिंगची स्टॅबिलिटी, होर्डिंगमुळे इमारतीमध्ये खिडक्या, गॅलरीद्वारे येणारा प्रकाश व हवेचा मार्ग बंद करून होर्डिंग लावले गेले आहेत, ही कारणे पुढे आली आहेत.

(Nagpur) नागपूर महापालिकेकडून (Municipal Corporation) नवीन होर्डिंग्जला परवानगी देताना किंवा जुन्या परवान्याचे नूतनीकरण करताना होर्डिंग व्यावसायिकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून इमारतीची क्षमता तपासली जायची. परंतु ९ मे २०२२ च्या नवीन होर्डिंग्ज धोरणानुसार ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही अट सोडून विभागाने होर्डिंग्जविरुद्ध नोटीस बजावली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in