NMC Comissioner News : नवे आयुक्त येणार, पण सरकारने महापालिकेची प्रयोगशाळा करू नये !

Commissioner : महापालिकेत नव्या आयुक्तांबाबत चर्चा रंगली आहे.
Nagpur Munidipal Corporation
Nagpur Munidipal CorporationSarkarnama

Nagpur Municipal Corporation News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे कार्यालयांमध्ये प्रशासक बसवण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेत आयुक्त राधाकृष्णन बी. सद्यःस्थितीत कारभार बघत आहेत. पण ते प्रशिक्षणासाठी विदेशात जाणार असल्यामुळे नवीन आयुक्तांची नियुक्ती होणार आहे. ही नियुक्ती प्रायोगिक तत्वावर असू नये, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. (This appointment should not be on trial basis)

प्रशासक राधाकृष्णन बी. दीर्घ कालावधीसाठी विदेशात प्रशिक्षणाला जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेत नव्या आयुक्तांबाबत चर्चा रंगली आहे. प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव असलेला अधिकारीच हवा, अशी कुजबुज अधिकारी व कर्मचाऱ्यांत आहे. येत्या काळात मनपा निवडणूक असल्याने राज्य सरकारने आयुक्तांबाबत महापालिकेची प्रयोगशाळा करू नये, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी दोन दिवसांपूर्वी नियुक्त झाले. राज्य सरकारने अद्याप या पदावर नियुक्ती केलेली नाही. त्यातच आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे प्रशिक्षणासाठी विदेशात जाणे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिकेत दोन महत्त्वाची पदे रिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली झालेलेच आयएएस अधिकारी आयुक्त म्हणून येणार असल्याची कुणकुण काहींना लागली आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव असलेलाच अधिकारी द्यायला हवा, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Nagpur Munidipal Corporation
Nagpur Politics News : डॉ. देशमुखांची सावनेरातून तयारी, तर मेघेंच्या बालेकिल्ल्यातून लढण्याचा केदारांना आग्रह !

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित..

महापालिकेत सध्या कचऱ्यावर प्रक्रियेसंबंधी तीनशे कोटींचा प्रकल्प, पुढील तीन वर्षात नऊशे कोटींचे सिमेंट रस्ते, असे मोठे प्रकल्प होऊ घातले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात होत आहे किंवा प्रस्तावित आहे. हे सर्व प्रकल्प योग्यरीत्या व निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रदीर्घ अनुभव असलेल्या आयुक्तांची महापालिकेला गरज असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

येत्या काळात महापालिका निवडणूकही होणार आहे. येथील प्रकल्पासोबत महापालिका निवडणूक तसेच त्यानंतर राजकीय नेत्यांना हाताळण्याचे कौशल्य असलेल्या अधिकारीच आयुक्त म्हणून हवा, अशी चर्चाही रंगली आहे.

Nagpur Munidipal Corporation
Nagpur Congress News : अंतर्गत वाद मिटला तरच कॉंग्रेसला बलाढ्य गडकरींशी लढणे शक्य !

उत्सुकता शिगेला..

आयुक्त राधाकृष्णन बी. २० जूननंतर प्रशिक्षणाला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत आयुक्त राधाकृष्णन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते गेल्यानंतर राज्य सरकार (State Government) उपराजधानीच्या (Nagpur) ठिकाणी प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करतात की नव्या दमाच्या अधिकाऱ्याची, याकडे महापालिकेसह (Municipal Corporation) शहरातील नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com