कॉंग्रेस शहराध्यक्षांना ‘हात’ दाखवत नितीश ग्वालवंशी भाजपमध्ये दाखल...

कॉंग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक नितीश ग्वालवंशी यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर तीन तासांमध्येच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Congress Corporatior with Nitin Gadkari, Devendra Fadanvis and others.
Congress Corporatior with Nitin Gadkari, Devendra Fadanvis and others.Sarkarnama

नागपूर : कॉंग्रेसचे माजी नगरसेवक नितीश ग्वालवंशी यांना २०१७च्या निवडणुकीत शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती. गेली पाच वर्षे ते नगरसेवक होते. पण माजी नगरसेवक झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी शहराध्यक्षांना ‘हात’ दाखवला आणि काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार ठाकरेंच्या पश्‍चिम मतदारसंघातून ते नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय.

कॉंग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक नितीश ग्वालवंशी यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर तीन तासांमध्येच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार विकास ठाकरे यांच्याच पश्चिम नागपूर मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी नगरसेवक नितीश ग्वालवंशी २०१७ मधील महापालिका निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १० मधून निवडून आले होते. या प्रभागातून चारही नगरसेवक कॉंग्रेसचे होते. गेली पाच वर्षे नितीश ग्वालवंशी यांनी नगरसेवकपद भोगले. महापालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर २२ दिवसांमध्येच त्यांनी कॉंग्रेस सोडली. त्यांनी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्याकडे दुपारी दीड वाजताच्या सुमारास पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. त्यानंतर दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. गडकरी यांनी त्यांच्या भाजपचा दुपट्टा देत त्यांचे स्वागत केले.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहर भाजप अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर देशमुख व भाजप कार्यकर्ते उपस्थितीत होते. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. आता त्यांनाच ‘हात’ दाखवून ग्वालवंशी भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे विकास ठाकरे यांनाही ग्वालवंशी यांचा राजीनामा मोठा धक्का मानला जात आहे. ग्वालवंशी यांच्यासोबत प्रभाग १० मधून साक्षी राऊत, रश्मी धुर्वे व गार्गी चोपडा या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

निवडून आल्यानंतर नितीश ग्वालवंशी व गार्गी चोपडा यांच्यातील मतभेद पुढे आले होते. नवीन महापौरांची निवड होण्यापूर्वीच गार्गी चोपडा यांनी नगरसेवकपदाचा राजीनामाही दिला होता. अखेर मनधरणीनंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. गार्गी चोपडा या कॉंग्रेसच्या तांत्रिकदृष्ट्य़ा नगरसेविका होत्या. परंतु, त्यांची भाजपशी जवळीक होती. त्यांचे पती माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा भाजपमध्ये गेले होते. आता नितीश ग्वालवंशीही भाजपमध्ये गेले. त्यामुळे चोपडा यांच्याशी त्यांची गाठ पडणार आहे.

Congress Corporatior with Nitin Gadkari, Devendra Fadanvis and others.
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

कॉंग्रेसकडून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार..

२०१७ मध्ये निवडणूक झाल्यानंतर महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड झाली होती. उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नितीश ग्वालवंशी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना कॉंग्रेसच्या एकूण २९ पैकी २८ मते मिळाली होती. भाजपचे दीपराज पार्डीकर निवडून आले होते.

आणखी माजी नगरसेवकांचीही चर्चा..

कॉंग्रेसचे आणखी माजी नगरसेवक कमलेश चौधरी, साक्षी राऊत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आज रंगली होती. परंतु कमलेश चौधरी यांनी कॉंग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे नमूद करीत भाजपमध्ये जाण्याचा कुठलाच इरादा नसल्याचे सांगितले. दुपारी चार वाजता केवळ नितीश ग्वालवंशी यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in