Nitin Gadkari : नितीन गडकरी अल्लू अर्जुनला नागपुरात आणणार; कारण...

गेल्या वर्षी २०२१ मध्ये दोन टप्प्यांत आणि यावर्षी मार्चमध्ये हा महोत्सव टप्प्याने घेण्यात आला. पण पुढील महिन्यात हा महोत्सव होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
Nitin Gadkari and Allu Arjun
Nitin Gadkari and Allu ArjunSarkrnama

MP Cultural Festival नागपूर : नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा २ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. तरीही गेल्या वर्षी २०२१ मध्ये दोन टप्प्यांत आणि यावर्षी मार्चमध्ये हा महोत्सव टप्प्याने घेण्यात आला. पण पुढील महिन्यात हा महोत्सव होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवात आतापर्यंत अनेक कलावंत नागपुरात (Nagpur) येऊन गेलेत. यंदा सारे काही जुळून आले तर पुष्पा चित्रपटाचा नायक दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनही (Allu Arjun) या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासाठी अल्लू अर्जुनला पत्र दिले असून त्याला आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अल्लू अर्जून सध्या रशीयामध्ये आहे. महोत्सवाच्या दरम्यान जर तो भारतात आला, तर निश्‍चितपणे या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवेल, असेही गडकरी म्हणाले.

यंदा २ ते ११ डिसेंबरपर्यंत नागपूरकरांना खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता उद्‍घाटन होईल. उद्‍घाटन समारंभात एक हजार नागपूरकर कलावंत ‘वंदे मातरम’ कार्यक्रम होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थात ३ डिसेंबरपासून गायक संगीतकार हरिहरण यांच्या लाईव्ह कार्यक्रमाने महोत्सवाची रंगत वाढणार आहे.

अमित त्रिवेदी, कविता कृष्णमूर्ती, मोहित चव्हाण या गायकांचे लाईव्ह कार्यक्रम होतील. कवी शैलेश लोढा यांच्या हास्यव्यंग कवितांचा कार्यक्रम, ‘चाणक्य’ महानाट्य, ‘तथागत’ हे भगवान बुद्धांवरील महानाट्य, ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्यही सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलावंताना दररोज अर्धा तास कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. यात पाच हजार महिलांचा भव्य गीतापठण कार्यक्रम, बालकलावंतांचा कार्यक्रम तसेच तृतीयपंथींनाही कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, आमदार प्रवीण दटके, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार नागो गाणार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जयप्रकाश गुप्ता, संदीप गवई, प्रा. मधुप पांडेय, डॉ. गौरीशंकर पाराशर आदी उपस्थित होते.

Nitin Gadkari and Allu Arjun
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार

अशी आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी...

- २ डिसेंबर : उद्‍घाटन, 'वंदेमातरम्' स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम

- ३ डिसेंबर : पद्मश्री गायक हरिहरन 'लाईव्ह इन कॉन्सर्ट'

- ४ डिसेंबर : अमित त्रिवेदी 'लाईव्ह इन कॉन्सर्ट'

- ५ डिसेंबर : अभिनेते मनोज जोशी यांचा 'चाणक्य' हा नाट्यप्रयोग

- ६ डिसेंबर : ‘तथागत’, भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्य

- ७ डिसेंबर : 'पुण्यश्लोक अहिल्या' महानाट्य

- ८ डिसेंबर : मनोज मुंतशिर यांचा 'मॉ, माटी और मोहब्बत' हा कार्यक्रम.

-९ डिसेंबर : अभिनेते व कवी शैलेश लोढा यांचा हास्यव्यंग कवितांचा कार्यक्रम

- १० डिसेंबर : सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती 'लाईव्ह इन कॉन्सर्ट'

- ११ डिसेंबर : गायक मोहित चौहाण 'लाईव्ह कॉन्सर्ट' व समारोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in