नितीन गडकरी राजकारण सोडणार?

Nitin Gadkari News| राजकारण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे.
Nitin Gadkari News|
Nitin Gadkari News|

नागपूर : 'मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडलं तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली. तसेच, आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झालं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. नागपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरीं बोलत होते. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले, आता राजकारण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण काय आहे, समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे, की सत्ताकारण आहे, हे समजून घेण्याची वेळ आली आहे. महात्मा गांधींपासून जे राजकीय कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आताच्या राजकारणात १०० टक्के सत्ताकारण झालं आहे.

Nitin Gadkari News|
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

“आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध होऊन त्यात दर्जात्मक बदल होण्यासाठी व्यक्तीत आणि नेतृत्वात गुणात्मक बदल व्हायला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. आपल्याला याची प्रेरणा थोर पुरुषांपासून आणि त्यांच्या विचारांतून मिळत असते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे. माझ्या एकट्याचचं कल्याण व्हावं, असं आपल्या संस्कृतीत लिहिलेलं नाही,” असं नितीन गडकरी यावेळी सांगितलं.

“माणसाचा मोठेपणा, कर्तृत्व आणि गुणवत्ता यांचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी कोणताही संबंध नाही. पण निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. त्यामुळे राजकारणात आणि क्रिकेटच्या खेळात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी यांनी नमुद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com