काँग्रेसमध्ये जाणार का? गडकरींनी स्पष्टच सांगितले

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भाजपने (BJP) संसदीय बोर्डातून हटवले आहे
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

Nitin Gadkari : नागपूर : भाजपच्या (BJP) केंद्रीय संसदीय मंडळातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान न दिल्यावर राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तसेच गडकरी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावरही गडकरी यांनी भाष्य केले.

नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले 'जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari
‘मला जेलमध्ये टाकण्याच्या तारखा दिल्या जात आहेत’

त्याच बरोबर उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण दिले. ते म्हणाले, व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा, राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क कसा वाढता राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला गडकरी यांनी दिला.

Nitin Gadkari
संसदीय बोर्डातून पत्ता कट झाल्यानंतर गडकरी पहिल्यांदा थेटच बोलले...

जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद असते. एखाद्याचे चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in