दिल्लीत खूप हुशारीनं काम कराव लागतं : नितीन गडकरींना काय सूचवायचाय

Nitin Gadkari | दोन महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नागपुर : ''मुंबई बेस्ट आहे. पण दिल्लीत खुप हुशारीने काम कराव लागतं. आता हुशारीचा नेमका अर्थ तुम्हीच समजून घ्या. ज्या लोकांना मी खुप मोठं समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला असं वाटलं की, मी त्यांना जितका मोठा समजतं होतो ते तितके मोठे नाहीत ते तर खूप छोटे आहेत. मी ज्यांना खूप छोटं समजत होतो, त्यांच्याजवळ गेल्यानंतर मला जाणवलं की ते खुप मोठे आहेत. हे मी माझ्या जीवनात अनुभवलयं,'' अशा शब्दातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पण त्यांच्या या वक्त्व्यांवरुन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय मंडळातून डावलण्यात आले. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय मंडळातून हटवण्यात आले. तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय मंडळात नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

Nitin Gadkari
मिंधे आणि कमळाबाईच्या अभद्र हातमिळवणीने महाराष्ट्राला ‘लुच्चे दिन’ ; ठाकरेंनी तोफ डागली

तेव्हापासून नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या भाषणातून आपली नाराजी बोलून दाखवली.  गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून वगळल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतानाही आपली नाराजी बोलून दाखवली होती. ''कोणाचा वापर करुन गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका'' असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.

तसेच, जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद असते. एखाद्याचे चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी अप्रत्यक्ष रित्या आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in