Nitin Gadkari : सांस्कृतिक मंत्री नसूनही सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य करत आहेत नितीन गडकरी...

Nagpur : नागपुरात २ ते ११ डिसेंबर या कालावधीत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

MP Cultural Festival : देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरचे (Nagpur) प्रतिनिधित्व करताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत आणि कामरुख पासून ते कच्छपर्यंत लोकांच्या हृदयामध्ये आपल्या कर्तृत्वाने आदराचे प्राप्त केले आहे. येताना मी नितीन या शब्दाचा संस्कृत अर्थ काय आहे, ते बघत होतो. नितीन या शब्दाचा संस्कृत अर्थ हा नीती व ज्ञान असा होतो. त्याच नीती आणि ज्ञानाचा संगम म्हणजे गडकरी आहेत, अशा शब्दांत राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी गडकरींची स्तुती केली.

उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर गणमान्य होते. नागपुरात २ ते ११ डिसेंबर या कालावधीत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा त्यांचे कार्य आपण पाहतो ते गडकरींचे कार्य आपल्याला देशामध्ये रस्त्याच्या रुपात, पायाभूत सुविधांच्या रूपाने दिसते. पण आज या ठिकाणी आल्यावर नितीन गडकरी सांस्कृतिक मंत्री नसूनही देशात सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य कुणी करत असेल ते नितीन गडकरी आहेत. इतक्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन येथे केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरकर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या लोकांना हजारो कलाकारांना ऐकता येतं आणि त्यांची कला बघता येते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेता येतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

आज जगामध्ये पर कॅपिटल इन्कमवर चर्चा होत नाही. देशाची जीडीपी किती याची चर्चा कमी होते. आता एकच चर्चा संयुक्त राष्ट्र संघामध्ये केली जाते, ती म्हणजे हॅप्पीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राष्ट्र. चेहऱ्यावरचे हास्य, मनाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचे एक शास्त्र आहे. ते शास्त्र म्हणजे चेहऱ्यावरचे हास्य. जगामध्ये आपण विचारलं सर्वात मोठा महागडं कॉस्मेटिक कोणतं, तर कुणी पॅरिस म्हणेल, कुणी म्हणेल लंडन. सांस्कृतिक कार्यक्रमात बसल्यावर जे भारतीय हास्य चेहऱ्यावर येतं, ते जगातलं सर्वांत महागडं कॉस्मेटिक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची पुन्हा जागतिक स्तरावर दखल...

सांगितले ‘न’ चे महत्व..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘न’ असेल, सुप्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘न’ असेल किंवा नितीन गडकरी यांचा ‘न’ असेल, हा ‘न’ देशातील लोकांना कायम विश्वास देतो. इतक्या भव्य आयोजन बघितल्यावर किती सूक्ष्म नियोजन केले असेल, हे लक्षात येते. कलावंतांची किती मोठी टीम गडकरींनी एकत्रित केली असेल, याचा अंदाज येतो. त्यांच्या कल्पकतेला सलाम, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com