नितीन देशमुखांचा `गनिमी कावा` फसवा.. शिंदेंनी त्यांना चार्टर्ड विमानाने पाठविले..

आमदार देशमुख यांचा गुवाहाटी ते नागपूर हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिलेदारांनी सन्मानाने त्यांना येथपर्यंत पोहोचवले.
Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh
Eknath Shinde's workers with MLA Nitin DeshmukhSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख काल परत आले. येथे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले. त्यानंतर ते अकोल्यासाठी रवाना झाले. मी स्वतः आपली सुटका करून आलो, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होत. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे.

Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airport
Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airportSarkarnama

आमदार नितीन देशमुख यांचा दावा खोटा आहे, हे दाखवणारी काही छायाचित्र आणि व्हिडिओ शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आली आहेत. आमदार देशमुख यांचा गुवाहाटी ते नागपूर हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिलेदारांनी सन्मानाने त्यांना येथपर्यंत पोहोचवले. येथे अकोल्याचे शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर त्यांना घ्यायला आले होते. येथून त्यांच्यासोबत कारने ते अकोल्याला गेले. नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अकोल्यात पोहोचल्यावरही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी जे दावे केले, ते धादांत खोटे आहे, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airport
Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airportSarkarnama

मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो. रात्री ३ वाजेपर्यंत रस्त्यावर होतो. कोणते वाहन भेटते का ते बघत होतो. वाहने येत जात होती, पण एकाही वाहनधारकाने मला घेतले नाही. माझ्या मागावर १०० ते १५० पोलिस होते. त्यांनी जबरदस्तीने तेथून उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेले, असे आमदार नितीन देशमुख यांनी काल सांगितले होते. मला हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. मी आजारी नव्हतो. मला बळजबरीने डाव्या दंडावर इंजेक्शन टोचण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airport
Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airportSarkarnama

आमदार नितीन देशमुख यांना गुजरात पोलिसांनी मारहाण केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या परत येण्यामागे हे तर कारण नाही ना, याचीही चाचपणी नंतर केले गेली. संजय राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये “आमदार नितीन देशमुख हे सुरतमध्ये भाजपच्या ताब्यात आहेत. त्यांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुजरात पोलिस आणि गुंडांनी त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला. मुंबईचे गुंडही तेथे आहेत. गुजरातच्या भूमीवर हिंसाचार?, असा आरोप केला होता.

Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airport
Eknath Shinde's workers with MLA Nitin Deshmukh on airportSarkarnama

आमदार नितीन देशमुख खोटं बोलत आहेत, हे सिद्ध करणारी छायाचित्र आणि व्हिडिओ एकनाथ शिंदे गटाने पुढे आणले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ बघता, आमदार देशमुखांवर कुठलीही बळजबरी केली गेली होती, असे वाटत नाही. पण मग ते खोटं कशासाठी बोलले? हा संभ्रम पसरवण्यामागे त्यांचा उद्देश काय? जर त्यांना चार्टर्ड प्लेनने सन्मानाने पाठवण्यात आले, तर मग ते स्वमर्जीने आले की, एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून ते परत आले, आदी प्रश्‍न उपस्थित होतात. या प्रश्‍नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com