Neelam Gorhe News: सभागृहात आमदारांना आवरेना मोबाईलचा मोह, सभापतींनी ‘अशी’ दिली समज !

Pandharpur : सभागृहात पंढरपूर कॉरीडोअरच्या संदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू होती.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama

Assembly Session: विधान परिषदेत कामकाज सुरू असताना काही सदस्य मोबाईलवर बोलतात. सभागृहात मोबाईल फोनवर न बोलण्याचा अगदी नियम जरी नसला, तरी सभागृहात मोबाईलवर बोलू नये, असा संकेत आहे. तरीसुद्धा आज काही सदस्य सभागृहात मोबाईल फोनवर बोलत होते. शेवटी सभापती निलम गोऱ्हे यांना सदस्यांना समज द्यावी लागली.

आज सभागृहात पंढरपूर कॉरीडोअरच्या संदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू होती. या चर्चेत महादेव जानकर, अमोल मिटकरी सचिन अहीर, मनीषा कायंदे, अनिकेत तटकरे हे सदस्य सहभागी झाले होते. यादरम्यान इतर काही सदस्य चर्चा सुरू असताना मोबाईलवर बोलत होते. ही बाब काही सदस्यांसह सभापती निलम गोऱ्हे यांच्याही लक्षात आली. तेव्हा त्यांना सदस्यांना समज द्यावी लागली.

सभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, या सभागृहातील सर्व सदस्य हुशार आणि समजदार आहेत. त्यामुळे चर्चा सुरू असताना त्यांनी मोबाईल फोनवर बोलू नये, अशी सामान्य अपेक्षा आहे. समज दिल्यावरही काही सदस्य समोर कागद धरून कागद वाचत असल्याचे भासवत मोबाईलवर बोलतात. पण हे आमच्या लक्षात येते आहे. कृपया असं करू नका. कारण तुमचं बोलणं आम्हाला वरती ऐकू येतं.

सभापती निलम गोऱ्हे यांनी असे सांगितल्यावर सदस्यांच्या लक्षात या विषयाची गंभीरता आली. त्यानंतर त्यांनी कामकाजादरम्यान मोबाईल फोनवर बोलणे बंद केले. त्यानंतर पंढरपूर कॉरीडोअरची चर्चा पुढे सुरू झाली. पंढरपूरचे कॉरीडोअर विकसीत करताना पुरातत्त्व वास्तूंना हात लावण्यात येणार नाही. वाराणसीच्या धर्तीवर विकास करायचा म्हणजे वाराणसीसारखा जसाच्या तसा होईल, असे काही नाही.

Neelam Gorhe
Nilam Gorhe News : नवे महिला धोरणात अंमलबजावणी करणारे कायदे असावेत..

कुणालाही त्रास न देता सर्वांच्या सूचना ऐकूनच पुढे काम करणार आहोत. मसुदा तयार केला जाईल. त्यासाठी देशपातळीवर कन्सलटंट नेमले आहेत. कामांची यादीही तयार आहे. मंदिरांना हात न लावता हा विकास आराखडा केलेला आहे. काही मंदिरे पाडली जाणार आहेत, अशा बातम्या पसरवल्यात जात आहे. हे खरे नाही. सर्व घटकांना विश्‍वासात घेऊनच आराखडा बनवला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सदस्यांच्या प्रश्‍नावर सांगितले.

या कामासाठी आलेल्या हरकतींच्या बाबतीतही सामंत (Uday Samant) यांनी सभागृहाला माहिती दिली. १३.९.२२ ते २६.९.२२ ७५ ९६४ आल्या. त्यांपैकी ५९८ विरोधातील होत्या. त्यानंतर १७.११.२०२२ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. कॉरीडोअरची रुंदी १२० मीटरची असावी अशी सक्ती केली नसल्याचेही उदय सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com